हवामान बदलांना ट्रम्प तडाखा! (साप्ताहिक सकाळ)
हवामान बदलांना ट्रम्प तडाखा ! पॅरिस करारातून अमेरिका बाहेर पडत असल्याच्या प्रस्तावावर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. त्याचे काय परिणाम होतील ? हवामान बदलाच्या लढ्याचे काय होईल ? अन्य विकसित देश काय करतील ? येत्या दोन-अडीच दशकातच पृथ्वीवरील मानवी जीवन संकटाच्या खाईत जाईल का ? अमेरिका या संकटांपासून स्वतःला दूर ठेवू शकेल का ? भावेश ब्राह्मणकर लॉस एंजेलिसच्या जंगलात लागलेल्या महाकाय वणव्याने पाहता पाहता हाहाकार माजवला. ३ हजाराहून अधिक एकरवर हे अग्नितांडव सुरू होते. ७० हजाराहून अधिक बेघर झाले. अमूल्य जैविक संपदा खाक झाली. १५० अब्ज डॉलरहून अधिक नुकसान झाले. हेलिकॉप्टर, विमानांच्या शेकडो फेऱ्यानंतरही आगीवर नियंत्रण येत नव्हते. कारण, वाऱ्याचा सुसाट वेग. हे सारे डोळ्यादेखत घडत असतानाही डोनाल्ड ट्रम्प यांना हवामान बदल किंवा जागतिक तापमान वाढ हे थोतांड वाटते, हे विशेष ! अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर ट्रम्प यांनी पॅरिस करारातून बाहेर पडण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी केली. जागतिकीकरणामुळे संपूर्ण जग खेड्यासारखे झाले आहे. त्यामुळे अमेरिकेच्या या निर्णयाचा मोठा परिणाम जगभर होणार...