पोस्ट्स

सप्टेंबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अमेरिकन निर्बंधांमुळे भारतापुढे हे तीन कठीण पर्याय (नवशक्ती)

इमेज
  ट्रम्प यांचा निर्णय आणि तांबड्या समुद्रातील चिंतानजक घडामोडींमुळे भारतात पुन्हा ऊर्जासंकट निर्माण होऊ शकते. त्यामुळे महागाई भडकण्याचीही भीती आहे. मोदी सरकारला अत्यंत कठीण परीक्षेला तोंड द्यायचे आहे. भावेश ब्राह्मणकर आंतरराष्ट्रीय राजकारणात मैत्री , भागीदारी आणि सहकार्य या शब्दांना महत्त्व असले , तरी प्रत्येक देशाच्या परराष्ट्र धोरणाचा अंतिम केंद्रबिंदू असतो तो राष्ट्रीय हिताचा. विशेषतः ऊर्जा सुरक्षेच्या बाबतीत कोणत्याही देशाला भावनिक भूमिका घेऊन चालत नाही. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या आणि मोठ्या प्रमाणावर आयात केलेल्या ऊर्जेवर अवलंबून असलेल्या देशासाठी तर हा प्रश्न अधिक संवेदनशील आहे. अशा पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या नव्या ‘रशिया प्रतिबंध कायद्या’मुळे भारतासमोर उभे राहिलेले आव्हान केवळ तेल खरेदीपुरते मर्यादित नाही. त्याचे पडसाद व्यापार , उद्योग , महागाई , परराष्ट्र धोरण आणि भारताच्या सामरिक स्वायत्ततेपर्यंत उमटू शकतात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेल्या ‘यू.एस.-रशिया सॅंक्शन्स ॲक्ट’मुळे रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू आयात करण...

चीनचा AI हवामान अंदाजाचा नवा जुगार (सामना उत्सव पुरवणी)

इमेज
नेपाळमधील हाहाकारा नंतर जगभर हवामान अंदाज आणि नैसर्गिक आपत्तींची चर्चा होत आहे. त्यातच चीनने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या ( AI) आधारे हवामान वर्तवण्याच्या क्षेत्रात घेतलेली मोठी झेप संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेत आहे. भावेश ब्राह्मणकर ‘ उद्या पाऊस पडेल का ?’ हा प्रश्न माणसाला शतकानुशतके पडत आला आहे. कधी आकाशातील ढग , वाऱ्याची दिशा , पक्ष्यांची हालचाल यावरून त्याचे उत्तर शोधले गेले ; पुढे हवामान केंद्रे , रडार , उपग्रह आणि संगणकीय मॉडेल्स आली. आता या प्रश्नाच्या उत्तरात कृत्रिम बुद्धिमत्तेची भर पडली आहे. फरक एवढाच की , यावेळी बदल फक्त हवामानाचा अंदाज घेण्याच्या पद्धतीत होत नाही ; हवामान समजून घेण्याच्या मानवी क्षमतेचीच पुनर्रचना होत आहे. चीनने या बदलाची दिशा ओळखून मोठी झेप घेतली आहे. शांघाय एआय लॅबोरेटरीचे फेंगवू ( Fengwu ) , हुआवेचे पेंगू ( Pangu ) आणि फुदान विद्यापीठाचे फुक्सी ( Fuxi ) यासारखी AI आधारित हवामान मॉडेल्स विकसित होत आहेत. पारंपरिक हवामान अंदाज पद्धतींना पर्याय म्हणून नव्हे , तर त्यांना पूरक ठरतील अशा या प्रणालींची क्षमता आता प्रत्यक्ष हवामान घटनांमध्ये तपासली जात आहे. काही...