पोस्ट्स

सप्टेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जंगल वाढत असल्याने टेन्शन! (सामना - उत्सव पुरवणी)

इमेज
जंगल वाढत असल्याने टेन्शन ! हो बरोबर वाचले तुम्ही ! जागतिक वारसा स्थळ असलेल्या या अभयारण्यात जंगल वाढत असल्याने मोठीच चिंता निर्माण झाली आहे. हे असे का घडते आहे ? वनविभाग आणि तज्ज्ञ विचारात का पडले आहेत ? भावेश ब्राह्मणकर सर्वसाधारणपणे झाडे तोडली जातात किंवा जंगल नष्ट होते म्हणून चिंता व्यक्त होते. कारण, पर्यावरणाच्या दृष्टीने ती बाब नकारात्मक असते. मात्र, अभयारण्यात जंगल वाढत असल्याने चिंता करण्यासारखी स्थिती आहे, असे कुणी सांगितले तर त्यावर तुमचा विश्वास बसेल ? पण ही वस्तुस्थिती आहे. आसाम मधील मानस राष्ट्रीय उद्यान हे जागतिक वारसा स्थळ आहे. आणि याठिकाणी वृक्षराजी वाढत असल्याने उद्यानाचे रुपांतर जंगलात होत आहे. ही बाब तेथील वन्यजीवांसाठी अडचणीची ठरत आहे.     हवामान बदलासह विविध कारणांमुळे गेल्या तीन दशकांत मानस राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पातील गवताळ प्रदेश जवळजवळ ५० टक्क्यांनी कमी झाला आहे. नैसर्गिक प्रक्रिया पाहता गवताळ प्रदेश कमी होऊन जंगल वाढणे यास १०० वर्षांहून अधिक काळ लागतो. मात्र, मानस राष्ट्रीय उद्यानात अवघ्या ३० वर्षात ही प्रक्रिया झाली असल्याने ती...

जगाचा नकाशा बदलणार? (साप्ताहिक सकाळ )

इमेज
जगाचा नकाशा बदलणार ? सध्या असलेल्या जगाच्या नकाशाला तीव्र विरोध करत ५५ देशांनी ‘ करेक्ट द मॅप ’ ही मोहिम सुरू केली आहे. अचानक असे काय घडले ? सध्याचा नकाशा केव्हा आणि कसा तयार झाला ? त्यात आता काय बदल होऊ घातले आहेत ? भावेश ब्राह्मणकर ‘ आपण सध्या पाहत आणि वापरत असलेला जगाचा नकाशा हा चुकीचा आहे. त्यात बदल करणे गरजेचे आहे. म्हणूनच ‘ करेक्ट द मॅप ’ या मोहिमेला इतरांनीही पाठिंबा द्यायला हवा ’ , असे आवाहन जगातील तब्बल ५५ देशांनी केले आहे. हे देश आहेत अफ्रिका खंडातील. त्यांच्या नाराजीचे कारण आहे त्यांच्या खंडाचा नकाशामधील दर्शविलेला आकार. तसे पाहिले तर पहिल्यांदाच अशा प्रकारे जगाच्या नकाशावर टीका होत नाहीय. यापूर्वीही ती झाली होती. मात्र, आता त्याची धार तीव्र असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नजिकच्या काळात जगाचा नकाशा बदलू शकतो किंवा सुधारित नकाशा सर्वांना उपलब्ध होऊ शकतो. सध्या वापरात असलेला नकाशाला मर्केटर नकाशा असे म्हटले जाते. तो तयार करण्यात आला सोळाव्या शतकात. जेरार्डस मर्केटर या व्यक्तीने तो विकसित केला. बेल्जिअमचा रहिवासी असलेला मर्केटर हा नकाशाकार होता. सोळाव्य़ा शतकामध्ये...

या स्थलांतरीतांचं करायचं काय? (नवशक्ती)

इमेज
या स्थलांतरीतांचं करायचं काय ? अमेरिका असो की फ्रान्स सर्वत्र स्थलांतरीतांचा प्रश्न उग्र झाला आहे. काही ठिकाणी निदर्शने होत आहेत तर काही ठिकाणी कठोर निर्णयाने झोप उडवून दिली जात आहे. ही समस्या नक्की सुटेल कशी ? भावेश ब्राह्मणकर एच१बी व्हिसासाठी आता एक लाख डॉलर अदा करणे बंधनकारक असतील, असा आदेश अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढला आहे. त्यामुळे जगभर त्याची चर्चा सुरू आहे. जगभरातून स्थलांतरीत अमेरिकेत येतात. त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होत नाही, असे कारण पुढे केले जात आहे. तर तिकडे फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये शेकडो नागरीक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी स्थलांतरीतांविरोधात आक्रोश व्यक्त केला. जोरदार निदर्शने केली. परिणामी, त्याचीही जगभर चर्चा झडते आहे. स्थलांतरीतांचा हा प्रश्न अचानक निर्माण झाला आहे का ? त्यास कुठल्या बाबी कारणीभूत ठरत आहेत ? हा प्रश्न सोडविण्यासाठी नक्की काय करायला हवे ? या सर्वाचा साकल्याने विचार होणे गरजेचे आहे. बिहारमध्ये लवकरच निवडणूक होणार आहे तर पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी. या दोन्ही राज्यात सध्या घुसखोर आणि स्थलांतरीतांचा प्रश्न उग्र झाला आ...

तुमच्या टूथपेस्टमध्ये आहे का हा घातक घटक? (सामना उत्सव पुरवणी)

इमेज
घातक मायक्रोबिडस घराघरात वापरल्या जाणाऱ्या टूथपेस्ट आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये घातक घटक असल्याचे कुणी सांगितले तर तुमचा विश्वास बसेल ? पण हे खरे आहे. घातक असलेल्या या घटकावर बंदी नसल्यानेच या उत्पादनांच्या वेष्टनावर तो घटक असल्याचे नमूदही केलेले आहे. तो घटक आहे मायक्रोबिडस. अर्थात कृत्रिम सूक्ष्म जीवाणू. अत्यंत सूक्ष्म स्वरुपाचा हा घटक चेहरा, त्वचा किंवा दातांवरील मृत पेशींना काढून टाकण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो. त्यामुळेच त्याचा वापर वाढला आहे. मात्र, हा घटक अतिशय घातक असल्याची बाब विविध संशोधनांमधून सिद्ध झाली आहे. अनेक देशांनी त्यावर बंदी घातली आहे. पण, भारतात नाही.  पॉलीइथिलीनपासून बनलेले हे मायक्रोबिडस म्हणजे प्लास्टिकचे सूक्ष्म तुकडेच. त्वचा, दात, चेहरा धूतल्यानंतर मायक्रोबिडस पाण्यात जातात. तेथूनच ते सांडपाण्यात मिसळतात. हेच सांडपाणी अनेक शहरांमधील नद्या, नाले यांच्यात सोडले जाते. मायक्रोबिडसचे विघटन होत नसल्याने ते पाण्यात किंवा वातावरणात तसेच राहतात. हेच दूषित पाणी शेतीसह अन्य ठिकाणी वापरले जाते. सांडपाण्याचा पुनर्वापर केला जातो. तेव्हाही हे घटक तसेच राहतात. मायक्रोबिडसम...

जगातील सर्वात मोठ्या कराराचे वेध (नवशक्ती)

इमेज
जगातील सर्वात मोठ्या कराराचे वेध अमेरिकन शुल्कामुळे बेजार झालेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला जगातील सर्वात मोठा करार खुणावतो आहे. गेल्या दोन वर्षांपासूनचे अथक परीश्रम फळाला येण्याची चिन्हे आहेत. हे ईप्सित साध्य झाले तर मोठा अध्यायच लिहिला जाईल. भावेश ब्राह्मणकर रशियाकडून तेल खरेदी करीत असल्याची जबर शिक्षा म्हणून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय मालावर थेट ५० टक्के आयात शुल्क लागू केले आहे. त्यामुळे भारत-अमेरिकेतला १२९ अब्ज डॉलरचा व्यवहार अडचणीत आला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला हा मोठा झटका आहे. कारण, भारतीय वस्तू अमेरिकेत निर्यात होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. या अडचणीच्या वरवंट्यात मात्र आशेचा किरण निर्माण झाला आहे. भारताने यापूर्वीच इंग्लंड सोबत मुक्त व्यापार करार केला आहे. आता जगातील सर्वात मोठा मुक्त व्यापार करार भारताच्या पुढ्यात येऊन ठेपला आहे. तो प्रत्यक्षात आला तर जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा मूलगामी परिणाम होणार आहे. शिवाय २०४७ पर्यंत विकसित भारताकडे नेण्याच्या संकल्पात तो मैलाचा दगडही ठरणार आहे. अमेरिकेने शुल्क लादल्यानंतर यासंदर्भात भारताकडून उघडपणे नाराजी...

पंजाबमध्ये पुराने हाहाकार का उडाला? (सामना - उत्सव पुरवणी)

इमेज
पंजाबमध्ये पुराने हाहाकार का उडाला ? कृषी समृद्ध पंजाब राज्यात अतिवृष्टी आणि महापुराने अक्षरशः हाहाकार उडाला आहे. शेकडो एकर शेती आणि १९०२ गावे पाण्यात गेली आहेत. ४ ते ५ हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. हे अचानक कसे आणि का घडले ? भावेश ब्राह्मणकर भारतातील एकूण २० टक्के गहू आणि १२ टक्के तांदूळ पंजाब राज्यात उत्पादित होतो. यावरुन या राज्याचे कृषी क्षेत्रातील योगदान कळून चुकते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पंजाबमध्ये अतिवृष्टी आणि महापुराने प्रचंड वाताहत झाली आहे. तेथे तब्बल ३.८ लाख नागरिक बाधित झाले आहेत तर ११.७ लाख हेक्टर शेतपिके नष्ट झाली आहेत. आतापर्यंत ४३ लोकांचा बळी गेला आहे. २३ जिल्ह्यांना पुराने वेढा दिला आहे. सुमारे ४ ते ५ हजार कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पाण्याने वेढलेली गावे आणि शेत यांचे फोटो तसेच व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाले आहेत. पण हे सारे कसे आणि का घडले यावर प्रकाश टाकणे आवश्यक आहे. पंजाबला यापूर्वीही महापुराने वेढल्याच्या नोंदी आहेत. १९५५, १९८८, १९९३, २०१९ आणि २०२३ मध्ये मोठी वाताहत झाली होती. आताही असेच घडते आहे. पंजाबमध्ये तीन प्रमुख नद्या आहेत....