पोस्ट्स

मे, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ग्रीन ऑस्कर विजेत्या बरखा आणि परवीन (सामना उत्सव पुरवणी)

इमेज
जगातील अत्यंत प्रतिष्ठेच्या ' ग्रीन ऑस्कर ' ने सन्मानित डॉ. बरखा सुब्बा आणि परवीन शेख या भारतीय महिलांच्या कारकिर्दीवर टाकलेला हा प्रकाश... भावेश ब्राह्मणकर निसर्ग संवर्धनाची व्याख्या जेव्हा जेव्हा केली जाते , तेव्हा मोठ्या आणि लोकप्रिय प्राण्यांचे चेहरे डोळ्यांसमोर येतात. वाघ , सिंह , हत्ती किंवा गेंडा वाचवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प राबवले जातात. पण याच निसर्ग साखळीचा मुख्य कणा असलेले छोटे उभयचर आणि दुर्मिळ पक्षी अनेकदा सरकारी धोरणांपासून ते जनमानसाच्या नजरेतून सुटून जातात. याच दुर्लक्षित आणि संकटग्रस्त प्रजातींचे अस्तित्व टिकवून धरण्यासाठी दोन भारतीय महिला शास्त्रज्ञांनी आपले आयुष्य पणाला लावले आहे. वन्यजीव संशोधक डॉ. बरखा सुब्बा आणि परवीन शेख या त्या दोन रणरागिणी , ज्यांनी आपल्या अभूतपूर्व संवर्धन कार्यामुळे नुकताच जागतिक पातळीवरील पर्यावरण क्षेत्रातील ऑस्कर मानला जाणारा ' व्हिटले पुरस्कार २०२६ ' पटकावला आहे. लंडनच्या ' रॉयल जिओग्राफिकल सोसायटी ' मध्ये जेव्हा युनायटेड किंगडमच्या प्रिन्सेस अॅन यांच्या हस्ते या दोघींना सन्मानित करण्यात आले , तेव्ह...

गौताळा औट्रमघाट अभयारण्य

इमेज
मराठवाडा आणि खान्देशच्या सीमेवर हे अभ्यारण्य आहे. त्याचा इतिहास , वैशिष्ट्ये , जैवविविधता , पर्यटन आणि सद्यस्थितीतील आव्हाने यावर प्रकाश टाकणारा हा लेख... भावेश ब्राह्मणकर छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या दोन जिल्ह्यांच्या सरहद्दीवर पसरलेला हा परिसर सातमाळा-अजिंठा डोंगररांगांच्या कवेमध्ये विसावला आहे. निसर्गाचा अद्भुत चमत्कार , समृद्ध जैवविविधता आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले हे अभयारण्य पर्यटकांना आणि पर्यावरणप्रेमींना नेहमीच भुरळ घालत आले आहे. गौताळा परिसराचे पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेऊन सरकारने या भागाला वन्यजीव संरक्षणाचा दर्जा देण्याचे ठरवले. या जंगलाची समृद्धी पाहून १९८६ मध्ये या परिसराला अभयारण्य म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात आले. हे अभयारण्य सुमारे २६०.६१ चौरस किलोमीटर (२६ , ०६१ हेक्टर) क्षेत्रावर पसरलेले आहे. याचा मोठा भाग जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुका आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यामध्ये येतो. प्रमुख वैशिष्ट्ये गौताळा औट्रमघाट अभयारण्य हे केवळ झाडा-झुडपांचे जंगल नसून त्याला मोठा ऐतिहासिक , धार्मिक आणि भौगोलिक वारसा आहे. गौतम ऋषींचे वास्तव्य: पौर...