चीनला वठणीवर आणण्यासाठी व्हिएतनामास्त्र! (अक्षरनामा)
चीनला वठणीवर आणण्यासाठी व्हिएतनामास्त्र ! दक्षिण चीन समुद्रात वर्चस्व गाजवू पाहणाऱ्या आणि व्हिएतनाम, फिलिपाईन्स, तैवान किंवा हाँगकाँगला गिळण्यासाठी आसुसलेल्या चीनला शह देण्यासाठी भारताने आपली चाल खेळली आहे. व्हिएतनामच्या पंतप्रधानांचा भारत दौरा अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणूनच या दौऱ्याकडे चीन बारकाईने लक्ष ठेवून आहे. भावेश ब्राह्मणकर व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिंग चिंग यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ सध्या भारत दौऱ्यावर आहे. चिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्यासह विविध महत्त्वाच्या मान्यवरांची भेट घेतली आहे. हा दौरा आणि भारत-व्हिएतनाम संबंध अनेक अर्थाने महत्त्वाचे आहेत. खासकरुन विस्तारवादाच्या महत्वाकांक्षेने पछाडलेल्या चीनला वठणीवर आणण्यासाठी. दक्षिण चीन समुद्रातील व्हिएतनाम हा तसा छोटा देश. पण, चीन सातत्याने त्यावर आपला हक्क बजावू पाहत आहे. दक्षिण आशियातील बलाढ्य देश असलेल्या भारताच्या मदतीने चीनला शह देण्यासाठी व्हिएतनाम उत्सुक आहे. तर, भारतालगतची सीमा अशांत ठेवून कुरापती करणाऱ्या चीनला जेरीस आणण्यासाठी व्हिएतनाम हा भारतासाठी हुकमी एक्का आहे. ...