पोस्ट्स

Bashar लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सिरीया : आगीतून थेट फुफाट्यात (नवशक्ती)

इमेज
धगधगत्या पश्चिम आशियातील आणखी एक देश अस्थिर झाला आहे. गृहयुद्धाच्या भडक्यानंतर सिरीयाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, हा देश आगीतून फुफाट्यात जात असल्याचे दिसून येत आहे. भावेश ब्राह्मणकर पश्चिम आशियातील इस्त्राईल, इराण, लेबनॉन आदी देशांमध्ये सुरू असलेल्या अस्थैर्यात आता सिरीयाची भर पडली आहे. गृहयुद्धामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ग्रस्त असलेल्या सिरीयामध्ये अखेर बंडखोरांनी विजय प्राप्त केला आहे. अध्यक्ष बशर अल असद हे देश सोडून पळून गेले आहेत. हयात तहरीर अल-शाम या बंडखोर गटाने आपला झेंडा फडकावला आहे. या गृहयुद्धात असाद कुटुंबाची गेल्या पाच दशकांहून अधिक काळाची सत्ता खालसा झाली आहे. हे काही अचानक घडलेले नाही. असद यांचे कुकर्म त्यास अधिक कारणीभूत आहे. बशर यांचे वडील हफीज अल असद यांनी तब्बल तीन दशके सिरीयाचे नेतृत्व केले. गृहयुद्ध आणि अस्थिरतेच्या गर्तेत असलेल्या सिरीयाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी काही प्रमाणात प्रयत्न केले. २००० मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचा उत्तराधिकारी आणि सिरीयाचा अध्यक्ष निश्चित झाला. बशर हे नेत्रशल्यचिकीत्सक म्हणून लंडनमध्ये सेवा बजावत होत...