पोस्ट्स

Production लेबलसह पोस्ट दाखवत आहे

...म्हणून नाशिकला झाले मिग २१ चे उत्पादन (साप्ताहिक सकाळ)

इमेज
...म्हणून नाशिकला झाले मिग २१ चे उत्पादन भारताच्या सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रात इतिहास घडविणारी मिग २१ ही लढाऊ विमाने सेवानिवृत्त होत आहेत. या विमानांचे संपूर्ण उत्पादन नाशिकच्या ओझरमध्ये झाले. ते कसे सुरू झाले ? त्यापूर्वी कुठल्या नाट्यमय घडामोडी घडल्या ? या विमानांमुळे संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेची पायाभरणी कशी झाली ? यांचा घेतलेला हा धांडोळा... भावेश ब्राह्मणकर ही घटना आहे १९६२ ची. चीनने भारतावर आक्रमण केले. या युद्धात भारताला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संरक्षणमंत्री पदासाठी यशवंतराव चव्हाण यांना पाचारण केले. चव्हाण त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत चव्हाण यांनी संरक्षणमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, केंद्रात मंत्री झाल्यामुळे त्यांना सहा महिन्याच्या आत खासदार होणे आवश्यक होते. ही बाब लक्षात घेऊन नाशिककरांनी चव्हाण यांना बिनविरोध निवडून दिले. हे ऋण फेडण्यासाठी चव्हाण यांनी नाशिकला मोठा संरक्षण प्रकल्प देण्याचे जाहीर केले. चीन युद्धामुळे भारताला जाणिव झाली ...

लढाऊ पंख ते डिफेन्स हब (साप्ताहिक सकाळ)

इमेज
लढाऊ पंख ते डिफेन्स हब देशाच्या संरक्षण क्षेत्रात नाशिकचे योगदान अतुलनीय आहे. लढाऊ विमानांच्या निर्मितीमुळे नाशिक संरक्षणाच्या नकाशावर आले. आता तर नाशिकची वाटचाल डिफेन्स हब अशी होत आहे. भावेश ब्राह्मणकर केंद्रीय संरक्षण मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)च्या ओझर येथील कारखान्यात लढाऊ विमानांचे उत्पादन केले जाते. याच कारखान्यात उत्पादित होणाऱ्या विमानांना लागणारे असंख्य सुटे भाग नाशिकमधील संरक्षण उद्योगांकडून पुरविले जातात. अधिकाधिक सुटे भाग पुरवावेत यासाठी एचएएलकडून खासगी उद्योजकांना आवाहन केले जात आहे. आणखी १२ सुखोई विमानांचे उत्पादन भारत सरकारने रशियन सरकारसोबत करार केल्यानंतर ओझर येथे मिग आणि सुखोई या लढाऊ विमानांची निर्मिती करण्यात आली. याच केंद्रात आता १२ सुखोई ३० एमकेआय लढाऊ विमानांचे उत्पादनांच्या निर्मितीसाठी १३,५०० रुपयांचे कंत्राट देण्यात आले ही विमाने स्वदेशी बनावटीची आहेत. त्यांना लागणारे सुटे भाग नाशिकच्या संरक्षण उद्योगांकडूनच खरेदी केले जात आहेत. तेजस विमानांसाठी नवे केंद्र तेजस या पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या लढाऊ विमानांची निर्...