जल व्यवस्थापन (वॉटर मॅनेजमेंट) मध्ये करिअर करायचंय?
पाऊस समाधानकारक झाला नाही तर धरणांमध्ये पाणी उपलब्ध होत नाही. परिणामी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. तिसरे महायुद्ध पाण्यावरुनच होईल असे म्हटले जाते. सुकाळ असो की दुष्काळ पाण्याचे मोल अनन्यसाधारणच आहे. वाढते शहरीकरण आणि सर्वच क्षेत्रांमध्ये वाढणारी पाण्याची मागणी लक्षात घेता पाणी व्यवस्थापनालाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या क्षेत्रात करिअर करुन आपण अनेकांची तहान भागवू शकतो. भावेश ब्राह्मणकर bhavbrahma@gmail.com पाणी अर्थातच जीवन. पाण्यामुळेच पृथ्वीवर जीवसृष्टी टिकून आहे. मानवाने आजवर अनेक शोध लावले असले तरी कृत्रिमरित्या पाणी निर्माण करण्यात अपयशच आले आहे. त्यामुळे नैसर्गिकरित्या उपलब्ध पाण्यावरच या जगाचा गाडा चालू आहे. पृथ्वीवर असलेल्या पाण्याच्या उपलब्धतेत गोडया पाण्याचे प्रमाण नगण्य (२.५ टक्के) आहे. यापैकी दोनतृतीयांश साठा हिमनगांमध्ये आहे. उर्वरित एकतृतीयांश साठयापैकी २० टक्के पाणी मनुष्याच्या पोहचण्यापलीकडे, तर ८० टक्के पाण्याचा तीन चतुर्थांश भाग पावसाच्या पाण्याच्या रूपात वाहून जातो. म्हणजे जेमतेम एक टक्काच पाणी आपल्याला वापरायला मिळते. त्यामुळेच पाणी ...