चमत्कार! …आणि नदी खळाळून वाहू लागली (सामना - उत्सव पुरवणी)
चमत्कार ! … आणि नदी खळाळून वाहू लागली जनता आणि प्रशासन यांनी ठरवलं तर काय होऊ शकतं याचा प्रत्यय सध्या उत्तर प्रदेशात येत आहे. कोरडीठाक झालेली नदी चक्क खळाळून वाहू लागली आहे. मात्र, हे काही एका रात्रीत झालेलं नाही. त्यामागं गेल्या दोन वर्षांचे अथक परीश्रम आहेत. कसं घडलं हे सगळं ? भावेश ब्राह्मणकर सर्वसाधारणपणे पर्यावरण क्षेत्रातील नकारात्मक बातम्याच प्राधान्याने समोर येतात. जसे की, प्रदूषण वाढले, हवामान बदलामुळे एवढे नुकसान झाले, दुष्काळ पडला, झाडे तोडली, जंगल नष्ट झाले, प्राण्यांची संख्या घटली वैगेरे. सकारात्मक घटना किंवा घडामोडींचे प्रमाण अतिशय नगण्य. याची विविध कारणे आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे विकास विरुद्ध पर्यावरण. मात्र, असे चित्र रंगवणे योग्य नाही. शाश्वत विकास याचाच अर्थ पर्यावरणाची काळजी घेत केलेली प्रगती अतिशय प्रभावी ठरते. विविध कारणांनी गाजणाऱ्या उत्तर प्रदेशात एक चांगली घटना घडली आहे. ती म्हणजे, मृत आणि कोरडीठाक झालेली नदी चक्क दुथडी भरून वाहू लागली आहे. या नदीचे नाव आहे नून. यमुनेची उपनदी असलेली ही नदी खळाळत असल्याने हजारो शेतकऱ्यांसाठी सिंचनाचा स्रोत निर्माण झाला...