पोर्तुगालमध्ये उजव्या विचारसरणीची धोक्याची घंटा? (नवशक्ति)
पोर्तुगीज जनतेने त्यांचा नवा राष्ट्राध्यक्ष निवडला आहे. तेथील राजकारण आणि आताचे निकाल नक्की काय सांगतात ? कुठल्या ऐतिहासिक घडामोडी तेथे घडल्या ? भावेश ब्राह्मणकर युरोपच्या नकाशावर शांत आणि लोकशाही मूल्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या पोर्तुगालने नुकताच आपला नवा राष्ट्राध्यक्ष निवडला आहे. मध्यममार्गी समाजवादी नेते अँटोनियो जोसे सेगुरो यांनी अध्यक्षीय निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीत दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र, या निकालाने एका वेगळ्या चर्चेला जन्म दिला आहे. हा विजय केवळ एका व्यक्तीचा किंवा पक्षाचा नसून , पोर्तुगालच्या राजकारणात वेगाने शिरकाव करणाऱ्या ' कट्टर उजव्या ' लाटेविरुद्धच्या संघर्षाचा एक टप्पा ठरला आहे. ही निवडणूक फक्त अध्यक्षाची निवड नव्हती , तर देशाच्या भावी राजकीय दिशेची , लोकशाही मूल्यांची आणि यूरोपमधील उदयोन्मुख राष्ट्रीयवादी धारांचा मुकाबला करण्याची परीक्षा होती. मार्सेलो रेबेलो डी सूसा हे दोनदा राष्ट्राध्यक्ष झाले. तेथील राज्यघटनेनुसार तिसऱ्यांदा निवडणूक लढविता येत नाही. त्यामुळे सूसा यांनी राजीनामा दिला. त्यामुळे राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. एकूण ११ उमेदवार र...