जायकवाडी पक्षी अभयारण्य
महाराष्ट्रातील पक्षीप्रेमी , पर्यावरण अभ्यासक आणि छायाचित्रकारांसाठी जायकवाडी पक्षी अभयारण्य महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. मात्र हे अभयारण्य स्थलांतरित पक्ष्यांचे आश्रयस्थान आहे की वाढत्या संकटातील जलभूमी असा प्रश्न उपस्थित होत आहे. भावेश ब्राह्मणकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणजवळ नाथसागर जलाशय परिसरात वसलेले हे अभयारण्य हजारो स्थलांतरित पक्ष्यांचे हिवाळी निवासस्थान आहे. मात्र , गेल्या काही वर्षांत मानवी हस्तक्षेप , जलव्यवस्थापनातील बदल आणि विकास प्रकल्पांमुळे हे अभयारण्य अनेक आव्हानांना सामोरे जात आहे. जायकवाडी धरण बांधून पूर्ण झाल्यानंतर नाथसागर जलाशय निर्माण झाला. या जलाशयातील जैवविविधतेचे महत्त्व लक्षात घेऊन १० ऑक्टोबर १९८६ रोजी जायकवाडी पक्षी अभयारण्य घोषित करण्यात आले. हे अभयारण्य सुमारे ३४१.०५ चौ. कि.मी. क्षेत्रात पसरलेले असून नाथसागर जलाशयातील सुमारे ३० बेटांचा समावेश यात होतो. ही बेटे पक्ष्यांच्या विश्रांती , प्रजनन आणि निवासासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. जायकवाडी पक्षी अभयारण्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे मध्य भारतातील महत्त्वाच्या जलपक्षी अधिवासांपैकी एक आ...