ट्रम्प पहिला घाव कुणावर घालणार? (नवशक्ती)
ट्रम्प पहिला घाव कुणावर घालणार ? येत्या २० जानेवारी रोजी अमेरिकन अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध वक्तव्यांद्वारे जगभरात खळबळ उडवून दिली आहे. आक्रमक परराष्ट्र धोरणाचे त्यांनी दिलेले संकेत धडकी भरवणारेच आहेत. कॅनडा, ग्रीनलँड, पनामा, चीन, नाटो देश यांच्या पोटात भितीचा गोळा उठला आहे. ट्रम्प पहिला घाव कुणावर घालतील ? भावेश ब्राह्मणकर ‘ लवकरच कॅनडा हे अमेरिकेचे ५१ वे राज्य असेल. जस्टीन ट्रुडो हे तेथील गव्हर्नर आहेत ’ , ‘ ग्रीनलँडवर अमेरिकेचे नियंत्रण आवश्यक आहे ’ , आणि ‘ पनामा कालवा पूर्वी आमचाच होता. मात्र, आता पुन्हा वेळ आली आहे ती त्याला अमेरिकेत समाविष्ट करण्याची ’ या तीन वक्तव्यांद्वारे डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच मोठा धुराळा उडवून दिला आहे. बलाढ्य आणि महासत्ता असलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष ठोसपणे जेव्हा असे म्हणतात तेव्हा ते तसे प्रत्यक्षात करुन दाखवतील याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. युक्रेन गिळण्यासाठी रशियाने युद्ध छेडले. त्याचपद्धतीने ट्रम्प हे या तिघांसाठी युद्ध पुकारतील का, असा प्रश्न निर्माण होत आहे. रशिया-युक्रेन...