पोस्ट्स

Education Career Green Architecture Environment लेबलसह पोस्ट दाखवत आहे

ऑफबीट करिअर - ग्रीन आर्किटेक्चर - बना ग्रीन विश्वकर्मा

इमेज
ऑफबीट करिअर - ग्रीन आर्किटेक्चर - बना ग्रीन विश्वकर्मा निवारा ही मानवी जीवनाची एक मुलभूत गरज आहे. या गरजेला गेल्या काही वर्षात अनन्यसाधारण महत्त्वही प्राप्त झालं आहे. त्यामुळेच ‘निवारा’ ही संकल्पना जाऊन त्या जागी ‘बंगला’ हा शब्द रुढ झाला आहे. म्हणजेच, जसा काळ बदलतोय तसा निवारा आणि बंगला या संकल्पनेतही लक्षणीय बदल झाले आहेत. ही संकल्पना अधिकाधिक विकसीत करण्यात केवळ बांधकामच नाही तर आर्किटेक्चर, इंटेरिअर या क्षेत्रांचाही मोलाचा वाटा आहे. या तिन्ही क्षेत्रांमधून सध्या ग्रीन बिल्डींग या संकल्पनेला विशेष प्राधान्य दिले जात आहे. वाढती महागाई आणि पायाभूत सुविधांचा होणारा विकास पाहता पर्यावरण स्नेही आणि ऊर्जेची बचत करणाऱ्या ग्रीन बिल्डींगला आगामी काळात प्रचंड महत्त्व प्राप्त होणार आहे. त्यामुळेच बहुविध पर्यावरणस्नेही उपाययोजना करणाऱ्या ग्रीन बिल्डींग उभारुन आपण आजच्या युगातले ग्रीन विश्वकर्मा बनू शकतो.  भावेश ब्राह्मणकर विश्वकर्मा घडविणारा अभ्यासक्रम म्हणून आर्किटेक्चर प्रसिद्ध आहे. इंजिनिअरिंग आणि मेडिकल यांच्याइतकाच लोकप्रिय अभ्यासक्रम म्हणून आर्किटेक्चर या अभ्यासक्रमाकडे पाहिले जाते. टे...