पोस्ट्स

Challenge लेबलसह पोस्ट दाखवत आहे

हिंसाचारग्रस्त मणिपूरची भळभळती जखम (नवशक्ती)

इमेज
हिंसाचारग्रस्त मणिपूरची भळभळती जखम ईशान्य भारतातील मणिपूर राज्यामध्ये पुन्हा हिंसाचार उफाळून आला आहे. गेल्या दीड वर्षांपासून तेथे हिंसक हल्ले होत आहेत. दुर्दैव म्हणजे, राज्य आणि केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. वांशिक संघर्षामुळे मणिपूर दहशतवाद्यांच्या तावडीत गेले तर भारताला ही बाब प्रचंड महागात पडू शकते. भावेश ब्राह्मणकर कुकी, मैतेई आणि नागा अशा तीन समाजातील अशा तीन समाजाची प्रमुख लोकसंख्या असलेल्या मणिपूरमध्ये गेल्या वर्षी हिंसाचाराची ठिणगी पडली. पाहता पाहता ती वणव्यासारखी पसरली. कुकी आणि मैतेई या दोन्ही समाजांमध्ये प्रचंड मोठी तेढ निर्माण झाली. दोन्ही गटांकडून एकमेकावर हिंसक हल्ले झाले. ही कमी म्हणून की काय तर एका समाजातील महिलेची निर्वस्त्र धिंड काढण्यात आली. त्याचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाला. राज्य आणि केंद्र सरकारचे धिंडवडे निघाले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. मणिपूरची स्थिती प्रचंड चिघळली. हजारो नागरिक बेघर झाले. अखेर निवासी छावण्यांमध्ये ते दाखल झाले. हे नागरिक गेल्या दीड वर्षांपासून याच छावण्यांमध्ये वास्तव्य करीत आहेत. या दरम्यान तेथील परिस्थिती सुधार...