पोस्ट्स

Census लेबलसह पोस्ट दाखवत आहे

गजान्तलक्ष्मी पावणार की कोपणार? (कान्हेरी दिवाळी अंक)

इमेज
गजान्तलक्ष्मी पावणार की कोपणार ? कोल्हापूरच्या महादेव हत्तीणीच्यानिमित्ताने देशभरात हत्तींचा प्रश्न चर्चिला जात आहे. माता लक्ष्मी भोवती असलेल्या हत्तींचे हिंदु धर्मात अनन्यसाधारण स्थान आहे. असे असतानाही विविध कारणांमुळे हत्तींचे भारतातील अस्तित्व धोक्यात येत आहे. राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित झालेला हत्ती भारतात गुण्यागोविंदानं नांदण्यासाठी अक्षरशः झगडत आहे. भावेश ब्राह्मणकर डायनासॉरच्या पश्चात पृथ्वीतलावर सर्वात शक्तीशाली आणि महाकाय असलेला प्राणी म्हणून हत्तींची ओळख आहे. जगाच्या पाठीवर दोन प्रकारचे हत्ती आढळतात. आशियाई आणि अफ्रिकी. हत्ती संपूर्ण विश्वातच आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. हत्ती हा एक सोंडधारी सस्तन प्राणी आहे. शास्त्रीय भाषेत हत्तीचा समावेश स्तनी वर्गाच्या प्रोबॉसिडिया गणाच्या एलिफंटिडी कुलात केला जातो. लांब सोंड , लांब सुळे , सुपासारखे पसरट कान आणि खांबासारखे जाडजूड पाय ही हत्तीच्या शरीराची वैशिष्ट्ये आहेत. संस्कृत भाषेत हत्तीला ‘हस्तिन’ असे नाव असून त्यावरून त्याला हत्ती हे नाव पडल्याचे सांगितले जाते. हत्ती हा प्राणी आफ्रिकेतील सहारा प्रदेश , दक्षिण आशिया आणि आग्नेय...