पोस्ट्स

Heat Cold Wave National Disaster High Court लेबलसह पोस्ट दाखवत आहे

उष्ण आणि शीत लाटा ही राष्ट्रीय आपत्ती (दै. नवशक्ती)

इमेज
  उष्ण आणि शीत लाटा या राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याची गरज राजस्थान उच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे. यातून नेमके काय साध्य होणार ? सर्वसामान्यांना त्याचा काय फायदा होणार ? भावेश ब्राह्मणकर संरक्षण, सामरिकशास्त्र व पर्यावरणाचे अभ्यासक व मुक्त पत्रकार bhavbrahma@gmail.com गेल्या आठवड्यात एकूण ४ बातम्यांनी सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले.  देशाची राजधानी नवी दिल्ली आणि महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे कमाल तापमान तब्बल ५३ अंश सेल्सिअसच्यापुढे नोंदले गेले आणि एकच गदारोळ झाला. हे नक्की काय घडतंय, अशा चिंता आणि नाराजीचा सूरही होता. मात्र, या तापमान नोंदी घेणाऱ्या यंत्रांचे सेन्सर्सच योग्य काम करीत नसल्याने एवढ्या उच्च तापमानाची नोंद झाल्याचे हवामानशास्त्र विभागाच्यावतीने सांगण्यात आले. त्यामुळे देशभरात याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा झडल्या. त्यातच राजस्थान उच्च न्यायालयाचा निकाल आला. उष्णतेच्या लाटेमुळे मृत्यू वाढत आहेत. त्यामुळे उष्णता आणि शीत लाटांना राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याची गरज न्यायालयाने नमूद केली. ही घोषणा का होणे आवश्यक आहे आणि त्याने नक्की ...