पोस्ट्स

Development लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कृत्रिम प्रज्ञेच्या वावटळात जग! (नवशक्ती)

इमेज
कृत्रिम प्रज्ञेच्या वावटळात जग ! फ्रान्समधील कृत्रिम प्रज्ञा परिषद... एलन मस्क यांना हवे असलेले चॅटजीपीटी... सॅम अल्टमनचा मस्कला जबर टोला... ५०० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीतून स्टारगेट कंपनीची ट्रम्प यांची घोषणा...अशा प्रकारे कृत्रिम प्रज्ञेच्या वावटळाने जग प्रभावित झाले आहे. आता पुढे काय ? भावेश ब्राह्मणकर गेल्या आठवड्याभरात जगभर ज्या वेगवान घडामोडी घडल्या त्या कृत्रिम प्रज्ञा अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या भोवतीच होत्या. त्यामुळे त्याच्याकडे सगळ्यांच्या नजरा वळल्या आहेत. तसे पाहता आता कुठे कृत्रिम प्रज्ञेचा शिरकाव विविध क्षेत्रात होत आहे. त्याचवेळी वावटळ उठणे स्वाभाविक आहे. ८० ते ९०च्या दशकात असेच वावटळ आले ते कॉम्प्युटरचे. मात्र, कृत्रिम प्रज्ञा जगभर नक्की काय काय घडवेल याचा अंदाज जाणकारांनाही येईनासा झाला आहे. त्यामुळे सध्या घडलेल्या घडामोडींकडे बारकाईने पाहणे आवश्यक आहे. फ्रान्समध्ये कृत्रिम प्रज्ञेची जागतिक परिषद संपन्न झाली. भारत हा सहआयोजक होता. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यास हजेरी लावली. तर, अनेक देशांचे उपाध्यक्ष, नेते, महत्वाचे मंत्री, कृत्रिम प्रज्ञेच्या क...

सागरमाला आणि वाढवण : विकासाची सुदर्शनचक्रे (साप्ताहिक सकाळ)

इमेज
जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झालेला भारत आता पहिल्या तीन मध्ये येण्याची स्वप्ने पहात आहे. गेल्या दीड दशकात विकास चक्रे गतिमान झाली आहेत. आणि आता सागरमाला ही योजना आणि वाढवण हे बंदर विकसित करण्याचे उद्दीष्ट समोर आहे. हे दोन्ही प्रकल्प म्हणजे विकासाचे सुदर्शनचक्रच म्हणायला हवे. कारण , सुदर्शन चक्र हे कुठल्याही बाजूला भरभिरतानाच अचूक लक्ष्य वेधते. अगदी तशाच पद्धतीने हे दोन्ही प्रकल्प प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या असंख्य क्षेत्र तसेच व्यवसायांवर परिणाम करणार आहेत. यातून रोजगार निर्मिती , गुंतवणूक आणि अर्थव्यवस्थेला चालना अपेक्षित आहे. भावेश ब्राह्मणकर सागरमाला प्रकल्प सागरमाला हा केंद्रातील मोदी सरकारचा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. भारताला तिन्ही बाजूने सागरी किनारा लाभला आहे. पश्चिमेला अरबी समुद्र , दक्षिणेला हिंद महासागर आणि पूर्वेला बंगालचा उपसागर. जलमार्गाने होणारी मालवाहतूक ही अधिक सुरक्षित , किफायतशीर आणि स्वच्छ आहे. सध्या भारतातील किमतीच्या दृष्टीने ९५ टक्के व संख्यामानानुसार ७० टक्के मालवाहतूक सागरी मार्गाने होते. तरीही आधुनिक तंत्रज्ञान व पायाभूत सुविधा यांच्या ...

संसदीय कामकाज व्हायला हवे (नवशक्ती)

इमेज
एखाद्या देशाशी थेट युद्ध करण्याऐवजी अप्रत्यक्ष युद्धाची अनेकानेक आयुधे उपलब्ध झाली आहेत. संसदीय कामकाजाला भूसुरुंग लावण्याचे शस्त्र त्यापैकीच एक आहे. गेल्या १०-१५ वर्षातील भारतीय संसदेचा इतिहास काय सांगतो ? भावेश ब्राह्मणकर सीमेवर सैनिक आणि शस्त्रास्त्रांसह युद्ध करण्याचा प्रघात आजच्या आधुनिक युगात मागे पडला आहे. शत्रूला समजणारही नाही अशा पद्धतीने त्याच्यावर भले मोठे अदृष्य आघात करणे, त्याला नामोहरम करणे, सर्वाधिक क्षती पोहचविणे किंवा पार वाताहत करणे अशा प्रकारच्या अत्याधुनिक युद्धशास्त्राचा सर्वत्र बोलबाला आहे. सायबर हल्ला हे त्यातील सर्वाधिक चर्चिले जाणारे शस्त्र आहे. मात्र, त्यापलिकडेही अनेक आयुधे आहेत. ज्याचा वापर अतिशय चपखल पद्धतीने केला जात आहे. खासकरुन गेल्या काही दशकातील भारतीय संसदेच्या कामकाजाचा आढावा घेतला तर ते प्रकर्षाने समोर येईल. भारतीय लोकशाही बळकट होण्यामध्ये संसदीय कामकाज अतिशय महत्वाचे आहे. जनतेने निवडून दिलेले खासदार ‘ देश की बडी पंचायत ’ मध्ये येतात. सत्ताधारी आणि विरोधक असे दोन्ही एकाच ठिकाणी जमतात. देशाचा गाडा योग्य पद्धतीने सुरू राहण्यासाठी, चुकत असेल तर स...

नाशिक-डहाणू रेल्वेमार्ग प्रत्यक्ष होणार?

इमेज
नाशिक-डहाणू रेल्वेमार्ग प्रत्यक्ष होणार ? तब्बल १९३२ सालापासून नाशिक-डहाणू रेल्वेमार्गाची चर्चा आणि मागणी आहे. आता केंद्र सरकारने या मार्गाच्या अंतिम सर्वेक्षणाला परवानगी दिली आहे. हा मार्ग एवढा महत्त्वाचा का आहे, त्यातून काय साध्य होणार आहे ? तसेच, प्रत्यक्षात हा मार्ग होणार का ? भावेश ब्राह्मणकर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काही दिवसांपूर्वीच घोषणा केली की, नाशिक ते डहाणू या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे अंतिम स्थान सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यामुळे या मार्गाविषयी पुन्हा एकदा चर्चा झडू लागली आहे. हा रेल्वेमार्ग एकूण शंभर किलोमीटर अंतराचा आहे. त्र्यंबकेश्वर आणि वाडगाव मार्गे ही रेल्वे धावणार आहे. डहाणूरोड हे सध्या पश्चिम रेल्वेवरील एक रेल्वेस्थानक आहे. त्याला नाशिकशी थेट जोडले जाणार आहे. या रेल्वे मार्गामुळे पालघर आणि नाशिक जिल्ह्याचा आदिवासी भाग विकासाच्या वाटेवर येणार आहे. दोन्ही जिल्ह्यातील महत्त्वाची शहरे रेल्वेने जोडली जातील. खास करून बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर आणि थंड हवेचे ठिकाण असलेले जव्हार येथे जाणाऱ्या भाविक आणि पर्यटकांसाठी मोठी सुविधा ...

७८ वर्षात नक्की काय कमावलं? काय गमावलं? (नवशक्ति)

इमेज
७८ वर्षात नक्की काय कमावलं ? काय गमावलं ? भारतीय स्वातंत्र्याला यंदा ७८ वर्षे पूर्ण झाली आहेत. एखाद्या देशाच्या वाटचालीत जवळपास ८ दशकांचा हा काळ अनेकविध बाबींनी महत्त्वाचा ठरतो. खासकरुन आपण नक्की काय कमावले ? आणि काय गमावले ? सिंहावलोकन करता आपल्याला काय दिसते ? भावेश ब्राह्मणकर १५ ऑगस्ट १९४७. ही भारत भूमीसाठी अत्यंत आनंद आणि अभिमानाची तारीख. ब्रिटीशांच्या जोखडातून ही भारत भूमी स्वतंत्र झाली. लोकशाहीच्या रुपाने नवा बिजांकूर येथे रोवला गेला. या घटनेला आज तब्बल ७८ वर्षे पूर्ण होत आहेत. अतिशय़ आश्वासक म्हणावा असा हा काळ आहे. काळ कुणासाठी थांबत नाही, असे म्हणतात. मग, तो भारतीय किंवा भारत भूमीसाठी कसा थांबेल ? जवळपास ८ दशकांच्या काळात अनेकानेक घटना, घडामोडी घडल्या. काही विक्रम झाले तर काही नोंदी बनल्या. यातील काही अप्रिय होत्या तर काही अभिमानास्पद. कुठल्याही देशाच्या वाटचालीत ७८ वर्षांचा काळ अतिशय महत्त्वाचा ठरतो. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आव्हानांचा डोंगर उभा होता. अन्नधान्याची उपलब्धता, रोजगार, महागाई, बेरोजगारी, पायाभूत सोयी-सुविधा, आर्थिक सुधारणा, शैक्षणिक, सामाजिक, स...