पोस्ट्स

Terror लेबलसह पोस्ट दाखवत आहे

खासदार शिष्टमंडळाच्या शिष्टाईचे यशापयश (नवशक्ती)

इमेज
खासदार शिष्टमंडळाच्या शिष्टाईचे यशापयश पहलगाम हल्ल्यानंतर भारताची भक्कम बाजू आणि पाकिस्तानचे पितळ उघडे पडण्यासाठी भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ सध्या देशोदेशीचे दौरे करीत आहे. या शिष्टमंडळाच्या शिष्टाईला कितपत यश आले आहे ? पाकिस्तानवर त्याचा काय आणि किती परिणाम होत आहे ? याचा विचार करणे आवश्यक आहे. भावेश ब्राह्मणकर काश्मीरमध्ये पर्यटनाचा आनंद घेणाऱ्या नागरिकांवर अमानुषपणे दहशतवाद्यांनी केलेला हल्ला भारताच्या खूपच जिव्हारी लागला. या दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचा हात असल्याचे दिसून आले. याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील एकूण नऊ दहशतवादी स्थळांना नष्ट करण्यात आले. मात्र , तडकाफडकी शस्त्रसंधी करण्यात आली. जी आजही कायम आहे. या शस्त्रसंधी संदर्भात अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. असो. एवढे मोठे ऑपरेशन राबवूनही पाकिस्तानला कुठलाही फटका बसत नाही किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशांकडून पाकिस्तानला एकटे पाडले जात नाही किंवा त्यांच्यावर कारवाई स्वरूप कुठलाही निर्णय होताना दिसत नसल्याने भारताने अखेर वेगळे अस्त्र...

अस्थिर पाकिस्तान फुटीच्या मार्गावर? (नवशक्ती)

इमेज
अस्थिर पाकिस्तान फुटीच्या मार्गावर ? बलुचिस्तान प्रांतात रेल्वेचे अपहरण आणि त्यानंतर पाक लष्करावर झालेला जबर हल्ला यामुळे पाकिस्तानातील अंतर्गत कलह, अस्थिरता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. दारिद्र्य आणि असंख्य समस्यांनी ग्रस्त असलेल्या पाकिस्तानचे विघटन होणार का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. भावेश ब्राह्मणकर महागाई, दारिद्र्य, बेरोजगारी, निरक्षरता, कुपोषण, पायाभूत सोयी-सुविधांचा अभाव, अस्वच्छता या आणि अशा कितीतरी समस्यांनी ग्रासलेल्या पाकिस्तानमध्ये दोन मोठे हल्ले झाले आहेत. त्यानिमित्ताने संपूर्ण जगाचे लक्ष पाककडे वळले आहे. पश्चिम पाकिस्तानातील बलुचिस्तान या प्रांतात हे हल्ले झाले आहेत. इराण आणि अफगाणिस्तानला लागून असलेला बलुचिस्तान हा प्रांत वाळवंटी आणि अत्यल्प सोयी-सुविधा असलेला आहे. येथील बलुच लिबरेशन आर्मी या बंडखोर गटाने सर्वप्रथम रेल्वेचे अपहरण केले. त्यानंतर पाक लष्कराच्या वाहनावर हल्ला केला. या दोन्ही घटना अतिशय महत्वाच्या आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या आहेत. शिवाय इतिहास काय सांगतो ते सुद्धा महत्वाचे आहे. त्यामुळे या सर्वाचा साकल्याने विचार होणे आवश्यक आह...