पोस्ट्स

वाळवंटात पूर आणि दुर्मिळ माकडांचे अस्तित्व (सामना उत्सव पुरवणी विशेष)

इमेज
सध्या हवामान बदलाचा हाहाकार पहायला मिळत आहे. भारतात मान्सून रेंगाळला आहे तर चीनमधील वाळवंटात पूर आला आणि इंडोनेशियात दुर्मिळ माकडे अस्त होण्याच्या मार्गावर आहेत. भावेश ब्राह्मणकर संपूर्ण जग सध्या एका वेगळ्या आणि अत्यंत चिंताजनक हवामान बदलाच्या कालखंडातून जात आहे. कधी नव्हे ते निसर्गाचे असे चमत्कार आणि प्रकोप पाहायला मिळत आहेत , ज्याची मानवाने कधी कल्पनाही केली नव्हती. नुकत्याच समोर आलेल्या दोन वेगवेगळ्या जागतिक घटनांनी पर्यावरण तज्ज्ञांची झोप उडवली आहे. एकीकडे चीनमधील जगातील सर्वात कोरड्या समजल्या जाणाऱ्या टाकलामाकन वाळवंटात भीषण पूर आला आहे , तर दुसरीकडे इंडोनेशियातील मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे जगातील अत्यंत दुर्मिळ अशा ' तापनुली ओरंगुटान ' या प्रजातीच्या माकडांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. या दोन्ही घटना मानवासाठी धोक्याची घंटा आहेत. चीनच्या उत्तर-पश्चिमेकडील शिनजियांग प्रांतात असलेले टाकलामाकन वाळवंट हे चीनमधील सर्वात मोठे आणि जगातील अत्यंत रखरखीत वाळवंट म्हणून ओळखले जाते. मात्र , यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीलाच या वाळवंटाने एका अभूतपूर्व संकटाचा सामना केला – तो...

राधानगरी वन्यजीव अभयारण्य : गव्यांचे नंदनवन आणि सह्याद्रीचा जैववैविध्य खजिना

इमेज
कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले राधानगरी वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या वनक्षेत्रांपैकी एक आहे. घनदाट सदाहरित जंगल , विपुल वन्यजीव , दुर्मिळ पक्षी आणि पश्चिम घाटाच्या जागतिक वारसा दर्जामुळे हे अभयारण्य पर्यावरणप्रेमी , वन्यजीव अभ्यासक आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील पहिले घोषित वन्यजीव अभयारण्य म्हणूनही राधानगरीची ओळख आहे. भावेश ब्राह्मणकर राधानगरी अभयारण्याची स्थापना १९५८ मध्ये करण्यात आली. सुरुवातीला याला "दाजीपूर अभयारण्य" म्हणून ओळखले जात असे. भारतीय गवा ( Indian Gaur) या भव्य वन्यप्राण्याच्या संरक्षणासाठी हे अभयारण्य निर्माण करण्यात आले. नंतर १९८५ मध्ये त्याला अधिकृतपणे राधानगरी वन्यजीव अभयारण्य असे नाव देण्यात आले. हे महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य मानले जाते. राधानगरी अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ३५१.१६ चौ. कि.मी. आहे. हे कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्याद्री पर्वतरांगांच्या दक्षिण टोकाला वसलेले आहे. भोगावती , दूधगंगा , तुळशी , कळम्मा आणि दिर्बा या नद्या या...

अर्मेनियातील निवडणूक निकालाचा अन्वयार्थ (दै लोकसत्ता)

इमेज
दक्षिण कॉकेशस प्रदेशातील अर्मेनिया या छोट्या पण धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या देशात नुकत्याच पार पडलेल्या संसदीय निवडणुकांनी जागतिक राजकारणाचे लक्ष वेधून घेतले आहे. पंतप्रधान निकोल पाशिन्यान  यांच्या  ' सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट '  पक्षाने मिळवलेला निर्णायक विजय हा केवळ एका पक्षाचा विजय नसून ,  अर्मेनियाच्या भविष्यातील परराष्ट्र धोरणाची दिशा ठरवणारा एक ऐतिहासिक टप्पा आहे. अझरबैजानसोबतच्या युद्धात झालेला दारूण पराभव आणि  ' नागोर्नो-काराबाख '  या ऐतिहासिकदृष्ट्या संवेदनशील भूभागावरील नियंत्रण गमावल्यानंतरही पाशिन्यान यांनी मिळवलेला हा विजय अनेकांसाठी चक्रावून टाकणारा आहे. तसेच रशियाचे सर्वेसर्वा पुतिन यांच्यासाठीही. भावेश ब्राह्मणकर अझरबैजानसोबतच्या २०२० मधील दुसऱ्या नागोर्नो-काराबाख युद्धात अर्मेनियाचा पराभव झाला. त्यानंतर हजारो आर्मेनियन नागरिकांना तिथून विस्थापित व्हावे लागले. कोणत्याही लोकशाही देशात अशा राष्ट्रीय आपत्तीनंतर सत्ताधारी नेत्याला गाशा गुंडाळावा लागतो. परंतु , निकोल पाशिन्यान यांनी या निवडणुकीत ४९.७ टक्के मते मिळवून पुन्हा एकदा सत्त...