पोस्ट्स

Investment लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सोना कितना ‘सोना’ है? (नवशक्ती)

इमेज
सोना कितना ‘ सोना ’ है ? सोन्याच्या दरांनी ८७ हजारांचा ऐतिहासिक आकडा पार केला आहे. आणि लवकरच हा आकडा ९० हजारांवर जाईल, असा अंदाज आहे. अचानक सोने महाग का झाले ? लग्नसराईत काय होणार ? सोन्यात गुंतवणूक करणे फायदेशीर आहे का ? आंतरराष्ट्रीय पातळीवर काय स्थिती आहे ? भावेश ब्राह्मणकर महिला वर्गात सर्वाधिक पसंतीचे असलेले सोने गेल्या काही दिवसांपासून फारच भाव खात असल्याचे दिसून येत आहे. प्रति ग्रॅमला ८७०० एवढा उच्चांकी दर नोंदला गेला आहे. सोन्यात अचानक एवढी तेजी का आली ? भारतात लग्नसराई सुरू झाली म्हणून की आणखी काही कारणे आहेत ? काही महिन्यांपूर्वी चीनने आंतरराष्ट्रीय बाजारातून भरमसाठ सोने खरेदी केले त्याचे काही कनेक्शन आहे का ? की अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प विराजमान झाल्याचा हा परिणाम आहे ? हे सारेच विस्ताराने समजून घेणे आवश्यक आहे. केवळ आभूषणांपुरते सोन्याचे मूल्य नाही. प्रतिष्ठेचे ते एक लक्षण आहे. शिवाय सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे. भारतीय मानसिकता ही गुंतवणुकीकडे अधिक असते. मोलमजुरी करणाऱ्यापासून ते गडगंज श्रीमंतांपर्यंत सारेच सोन्यात सुख शोधत असतात. वेळेप्रसंग...