पोस्ट्स

India Kerala Landslide Natural Disaster लेबलसह पोस्ट दाखवत आहे

विकासाचा रोग गिळतोय गावेच्या गावे (दै. नवशक्ति)

इमेज
विकासाचा रोग गिळतोय गावेच्या गावे केरळच्या वायनाडमध्ये अख्खा डोंगरच कोसळून तब्बल ४ गावे त्याखाली गाडली गेली आहेत. भूस्खलन , दरडी कोसळण्याच्या घटना तशा नवीन नाहीत. वारंवार त्या होत असल्या तरी त्यातून ना आपण धडा घेतला आहे , ना काही संदेश. म्हणूनच निष्पाप जीवांचा बळी जातोच आहे आणि सरकार व प्रशासन ढिम्मपणे पहातच आहे. भावेश ब्राह्मणकर नैसर्गिक आपत्ती ही किती महाकाय असते याचा प्रत्यय विविध माध्यमातून येत असतो. कधी त्सुनामी , कधी भूकंप , भूस्खलन , चक्रीवादळ, अतिवृष्टी तर कधी दुष्काळ. केरळच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. वायनाडमध्ये निसर्गाच्या कुशीतील चार गावे अचानक गडप झाली आहेत. आतापर्यंत १२३ हून अधिक जणांचा बळी गेल्याचे समोर येत आहे. शोधकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची चिन्हे आहेत. भूस्खलन किंवा दरड कोसळण्याच्या आपत्तीला तोंड देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. १९६८ मध्ये दार्जिलिंग (१ हजार मृत्यू) , १९९८ मध्ये उत्तराखंड (३०० मृत्यू) , २०१३ मध्ये उत्तराखंडमधील केदारनाथ (५७०० मृत्यू) , २०१४ मध्ये पुणे जिल्ह्यातील माळीण (१५१ मृत्यू) , २०२० मध्ये केरळचे पेट्टीमुडी (६५ मृत्य...