ऑफबीट करिअर - हॉटेल मॅनेजमेंट - असे करा आदरातिथ्य
ऑफबीट करिअर - हॉटेल मॅनेजमेंट - असे करा आदरातिथ्य ‘अतिथी देवो भव’ ही भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. त्यामुळेच आदरातिथ्याला विशेष असा दर्जा आहे. आजच्या आधुनिक भाषेत सांगायचे तर हॉटेल इंडस्ट्रीच्या माध्यमातून पर्यटकांचा आदर करणे, त्यांना सेवा आणि सुविधा देण्याचे हे क्षेत्र आहे. या क्षेत्रात करिअर करुन अनेकांना समाधानी करण्याचे श्रेय आपल्याला मिळू शकते. भावेश ब्राह्मणकर केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या अहवालानुसार, २०११मध्ये पर्यटकांनी सर्वाधिक पसंती महाराष्ट्राला दिली आहे. २०११मध्ये १९.५ दशलक्ष परदेशी पर्यटकांनी देशातील विविध राज्यांना तसेच केंद्रशासित प्रदेशांना भेटी दिल्या. याचाच अर्थ देशात पर्यटनाला मोठी चालना मिळत आहे. पर्यटन आणि हॉटेल व्यवसाय या दोन्ही एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत, असे म्हटले तर वावगे ठरत नाही. त्यामुळे पर्यटनात हॉटेल व्यवसाय अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. पर्यटन व्यवसायाची जसी वाढ होते आहे तशी देशभरातील हॉटेलची संख्याही. देशात १० लाखांहून अधिल लहान-मोठी हॉटेल्स असल्याचे सांगण्यात येते. एका संस्थेच्या अहवालानुसार, देशातील १२० कोटी लोकसंख्येपैकी १० कोटी ...