वाळवंटात चक्क बर्फ! आनंददायी की दुःखदायी? (नवशक्ती)
जगभरात सध्या काही फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल झाले आहेत. सौदी अरेबियातील वाळवंटात बर्फ पडल्याचे. बर्फाच्छादित भागात ऊंटांना पाहून सारेच आश्चर्यचकित होत आहेत. मात्र, हे अचानक कसे घडले ? ही घटना आहे की आपत्ती ? भावेश ब्राह्मणकर सौदी अरेबिया म्हटले की सर्वांच्या डोळ्यांसमोर येते ते अंतहीन वाळवंट , घाम फोडणारा तप्त उन्हाळा , भाजून काढणारे ४५ ते ५० अंश सेल्सियस तापमान आणि असह्य असे कोरडे हवामान. अशा वातावरणात चक्क बर्फवृष्टी झाल्याचे तुम्हाला कुणी सांगितले तर त्यावर तुमचा विश्वास बसेल ? सोशल मिडियात सध्या काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. ते खरे की खोटे ? कृत्रिम बुद्धिमत्तेने ते बनविलेले नाहीत ना ? वाळवंटी असलेल्या प्रदेशात हिमवर्षाव होणे ही कल्पनाच मुळात अविश्वसनीय वाटावी अशी आहे. मात्र काही दिवसांपूर्वी सौदी अरेबियाच्या उत्तर भागात पडलेल्या बर्फाने ही कल्पना प्रत्यक्षात उतरवली. सोशल मीडियावर व्हायरल झालेले बर्फाच्छादित डोंगर , पांढऱ्या शुभ्र चादरीत लपलेले वाळवंटी प्रदेश, बर्फातून मार्गक्रमण करणारे ऊंट, वाळवंटातील पिवळसर वाळूवर बर्फाचा थर ...