पोस्ट्स

South Pacific Ocean लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कुणी न्याय देतं का न्याय? (नवशक्ती)

इमेज
आंतरराष्ट्रीय न्यायालयात एक याचिका दाखल झाल्याने संपूर्ण जगाचे लक्ष त्याकडे लागले आहे. असं काय आहे या याचिकेत ? याचिकेकर्ते कोण आहेत ? आजवर असंख्य खटले दाखल झाले पण हे वेगळे का ? संभाव्य निकालाचा जगावर काय परिणाम होणार ?  भावेश ब्राह्मणकर व्हानुआतू. दक्षिण पॅसिफिक महासागरात असलेला अगदी छोटासा देश. ऑस्ट्रेलियापासून १७५० किलोमीटर लांबीवर असलेले हे इवलेसे बेट. याच द्वीपाने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. ही बाब माध्यमांमध्ये येताच संपूर्ण जगभर त्याची चर्चा होत आहे. नेदरलँडच्या हेगमधील या न्यायालयात जगभरातून असंख्य याचिका दाखल होतात, सुनावण्या होतात, निकाल दिले जातात मग या याचिकेत वेगळे काय आहे ? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. हा इवलासा देश त्याची कैफियत घेऊन न्यायालयात आला असला तरी, ती असंख्य देशांची आहे. त्यामुळे या याचिकेचे महत्व अनन्यसाधारण आहे. म्हणूनच न्यायालयाचा निकाल ऐतिहासिक ठरणार आहे. हवामान बदलाच्या संकटाला तोंड देणारा हा देश अतिशय पिचला आहे. अनेकानेक संकटांनी घेरलेल्या आणि रोजचे जगणेच जणू मुश्कील झालेल्या या द्वीपाने अखेर हवामान न्यायासाठी धाव घेतल...