पोस्ट्स

International India China Tibet USA Act लेबलसह पोस्ट दाखवत आहे

तिबेटवरुन भारताने केली चीनची कोंडी (दै. नवशक्ती)

इमेज
तिबेटवरुन भारताने केली चीनची कोंडी वेगवेगळ्या मार्गाने फुत्कारणाऱ्या चिनी ड्रॅगनला वठणीवर आणण्यासाठी भारताने नामी चाल खेळली आहे. यावेळी मोहरा आहे तो तिबेटचा. अमेरिकन शिष्टमंडळाचा भारत दौरा आणि आता दलाई लामांचा अमेरिका दौरा चीनला चांगलाच झोंबणार आहे. भावेश ब्राह्मणकर अमेरिकन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष मायकल मॅकॉल यांच्या नेतृत्वाखालील तेथील काँग्रेस (अमेरिकी कायदेमंडळ) सदस्यांच्या शिष्टमंडळाने सर्वोच्च बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांची भारतात येऊन भेट घेतली. १९ जून रोजीची ही भेट तशी पाहता   काही साधी घटना नाही. त्याला विविध कंगोरे आहेत. ते जाणून घेतले की, आपल्याला त्यातील अनेक बारकावे लक्षात येतील. जागतिक पटलावर चीनला खिंडीत गाठण्यासाठी भारताने ही नामी संधी साधली आहे. ती कशी ? जागतिक पातळीवर याचे काय परिणाम होणार ? विविध क्षेत्रात सहकार्य करणारा अमेरिका आता चीनला कसा लक्ष्य करतो आहे ? आणि चीन आगामी काळात चक्रव्युहात तर अडकणार नाही ना ! अशा प्रकारच्या व्यूहनितीची सध्या जोरदार चर्चा होत आहे. गृहयुद्धानंतर चीनने तिबेटवर आक्रमण करुन तो प्रदेश बळक...