वन्यजीव अर्थात वाईल्ड लाईफ क्षेत्रात करिअर करायचं आहे?
वाघ, सिंह, हत्ती, गेंडे, पाणघोडा, चितळ, सांभर या आणि अशा असंख्य वन्यजीवांना पिक्चर्स आणि टीव्हीच्या माध्यमातून पाहण्याची संधी मिळत असली तरी त्यांना न्याहाळण्यासाठी प्रत्यक्ष जंगलातच जावे लागते. जैविक विविधतेतील अमूल्य असा घटक असलेल्या या वन्यजीवांविषयी असलेल्या आकर्षण आणि प्रेमातूनच त्यांच्यासाठी काम करतानाच स्वतःचे करिअर घडविण्याचीही मोठी संधी आहे. भावेश ब्राह्मणकर bhavbrahma@gmail.com वनसंपत्ती आणि वन्यजीव ही निसर्गाने दिलेली अनोखी देणगीच आहे. भारतासारख्या देशात तर निसर्गाने वैविध्यपूर्ण अशा वन्यजीवांची उपलब्धी दिली आहे. पश्चिम घाटासारख्या जागतिक वारसा असलेल्या भागात तर विपुल प्रमाणात वृक्ष आणि वन्यजीव आहेत. देशभरात असलेल्या जंगल आणि अभयारण्यांद्वारे ही संपदा तसेच बहुविधता टिकून आहे. जंगलांमधून रबर, लाकूड, औषधी वनस्पती, फळे, फुले आदिंचा लाभ होतो. त्यामुळेच देशाच्या विकासात वनांचा वाटाही अत्यंत मोलाचा ठरतो. अभयारण्ये आणि आरक्षित वनक्षेत्रांच्या माध्यमातून ही नैसर्गिक संपदा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न वनविभागाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकार करीत आहे. प्रत्यक्षात ३३ टक्के वनांच...