पोस्ट्स

मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ट्रम्प यांनी रशियासाठी पेटवले युद्ध?

इमेज
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाच्या फायद्यासाठी इराण युद्धात उडी घेतली आहे. हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटले ना ! पण , हे खरे आहे . ते कसे ? भावेश ब्राह्मणकर पर्शियन आखातातील तणाव आणि इराणसोबत सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक राजकारणाचे केंद्र पुन्हा एकदा आखाती देशांकडे सरकले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विजयाचे दावे करत असले , तरी जमिनीवरील वास्तव वेगळे आहे. ' होर्मुझची सामुद्रधुनी ' बंद झाल्यामुळे केवळ कच्च्या तेलाचेच नव्हे , तर जागतिक अन्नसुरक्षेचे आणि खत बाजारपेठेचे गणितही पूर्णपणे बिघडले आहे. मात्र , या सर्व रणधुमाळीत रशिया हा सर्वात मोठा ' सुप्त लाभार्थी ' म्हणून समोर येत आहे. युक्रेन युद्धामुळे जागतिक राजकारणात कोपऱ्यात ढकलल्या गेलेल्या व्लादिमीर पुतिन यांच्या रशियाला इराण युद्धाने जणू नवी संजीवनी दिली आहे. रशियाच्या तिजोरीत अब्जावधींची भर होर्मुझची सामुद्रधुनी बंद होणे हे तेल उद्योगासाठी नेहमीच एक ' दुःस्वप्न ' मानले जात असे. आज ते वास्तव बनले आहे. जगातील एकूण तेल वाहतुकीपैकी एक तृतीयांश वाहतूक या मार्गाने होते. यु...

‘जेन झी’ची ‘नेट झी’ मोहिम! (सामना उत्सव पुरवणी)

इमेज
जगातील ६० देशांमधील ५५० हून अधिक विद्यापीठातील ‘ जेन झी ’ सध्या ‘ नेट झी ’ मोहिमेमध्ये गुंतले आहेत. पर्यावरण संकटाविषयी केवळ चिंता करण्यापेक्षा या सर्वांनी प्रत्यक्ष कृती सुरू करुन मोठा आदर्श निर्माण केला आहे. भावेश ब्राह्मणकर जगभरात २१ मार्च हा वन दिन, २२ मार्च जल दिन आणि २३ मार्च रोजी हवामान दिन साजरा होत आहे. हे तिन्ही दिवस साजरे करण्यामागे पर्यावरण रक्षणाची जाणिव निर्माण करणे हेच आहे. आणि याच दिनाच्या निमित्ताने आपण एका नाविन्यपूर्ण मोहिमेविषयी जाणून घेणार आहोत. नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश येथे ‘जेन झी’ने केलेल्या आंदोलनाची जगभर चर्चा झाली. मात्र, जगभरातील ‘जेन झी’ अतिशय सकारात्मक कार्य करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यास निमित्त ठरले आहे ते पुण्यातील पर्यावरण शास्त्रज्ञ आणि ग्रीन तेर फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. राजेंद्र शेंडे. पूर्वी ते संयुक्त राष्ट्राच्या ओझोन कृती समितीचे प्रमुख होते. तेथून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी तरुणांना डोळ्यासमोर ठेवत एक महत्वाकांक्षी मिशन हाती घेतले आहे. विद्यापीठातील तरुणांना पर्यावरण योद्धे बनविण्याची नेट झिरो ही चळवळ पाहता पाहता ६० देशातील ५५० हून अध...

गाझा, व्हेनेझुएला, इराणनंतर ट्रम्पच्या रडारवर कोण? (नवशक्ति)

इमेज
गाझात हाहाकार करून तेथे पर्यटन शहर साकारण्याची घोषणा, व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांचे झोपेतच अपहरण, इराणच्या अध्यक्षांसह महत्वाच्या नेत्यांची हत्या केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर आता कोणता देश आहे ? भावेश ब्राह्मणकर मनमानी आणि बेमूर्वत कारभारासाठी ख्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन अध्यक्षपदाला काळीमा फासली आहे. एकीकडे शांततेचे नोबेल मिळावा असा हट्ट धरायचा आणि दुसरीकडे कोट्यवधी निष्पाप जिवांशी खेळायचे अशी त्यांची अहमहमिका आहे. गाझा पट्टीमध्ये शेकडो कुटुंबांना उद्धवस्त केल्यानंतर तेथे भव्य पर्यटन सिटी साकारण्याचा मनसुबा व्यावसायिक ट्रम्प यांनी जाहीर केला. सारे जगच त्याने अचंबित झाले. हे सारे थांबत नाही तोच ट्रम्प यांच्या आदेशाने व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सेलिया फ्लोरेस यांचे पहाटेच्या सुमारास अपहरण झाले. अमेरिकन फौजांनी अध्यक्ष निवासात घुसून ही कारवाई केली. त्यानंतर गेल्या महिन्यात इराणचे सर्वेसर्वा अली खामेनी यांच्यासह सत्ताधारी गटातील अनेक उच्चपदस्थ अधिकारी आणि इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या नेत्यांची निघृण हत्या करण्यात आली. आंतररा...