पोस्ट्स

एप्रिल, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पाणघोड्यांना ठार मारण्याचे फर्मान

इमेज
जगभरात सध्या कोलंबिया सरकारच्या या अजब निर्णयाची चर्चा होत आहे. मात्र, ही वेळ त्यांच्यावर का आली ? पाणघोडे नकोसे का झाले आहेत ? ठार मारण्याऐवजी अन्य काही पर्याय आहे का ? भावेश ब्राह्मणकर १९८० च्या दशकात कोलंबियामध्ये अंमली पदार्थांच्या काळ्या साम्राज्याचा सम्राट पाब्लो एस्कोबार याने जेव्हा आपल्या ' हॅसिएंडा नापोलेस ' या आलिशान इस्टेटवर आफ्रिकेतून चार हिप्पो (पाणघोडे) आणले होते , तेव्हा कोणालाही कल्पना नव्हती की , हे प्राणी भविष्यात दक्षिण अमेरिकेच्या पर्यावरणासाठी ' टायमिंग बॉम्ब ' ठरणार आहेत. आज एस्कोबारच्या मृत्यूनंतर तीन दशकांनंतरही , त्याचे हे ' विदेशी वारसदार ' कोलंबियाच्या मॅग्डालेना नदीच्या खोऱ्यात आपले साम्राज्य विस्तारत आहेत. अलीकडेच कोलंबिया सरकारने यातील ८० हिप्पोंना ठार मारण्याची ( Culling) दिलेली परवानगी म्हणजे केवळ एका प्राण्याला संपवण्याचा निर्णय नसून , तो मानवी हस्तक्षेप , पर्यावरण आणि नैतिकता यांच्यातील संघर्षाचा एक नवीन अंक आहे. १९९३ मध्ये पाब्लो एस्कोबारच्या मृत्यूनंतर त्याच्या खासगी प्राणीसंग्रहालयातील झेब्रा , जिराफ यांसारखे इतर प्राण...

नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य

इमेज
महाराष्ट्राचे भरतपूर आणि रामसर स्थळ म्हणून ओळख असलेले नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य अनेक अर्थाने महत्वाचे आहे. चला तर जाणून घेऊ या अभ्यारण्याविषयी सविस्तर... भावेश ब्राह्मणकर नाशिक जिल्ह्यातील नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य हे राज्यातील सर्वात महत्त्वाचे पक्षी अभयारण्य मानले जाते. ‘महाराष्ट्राचे भरतपूर’ म्हणून ओळखले जाणारे हे अभयारण्य जैवविविधतेचा समृद्ध खजिना जपणारे आहे. विशेष म्हणजे , या अभयारण्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून ते रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रदेशाचे पर्यावरणीय महत्त्व अधिक अधोरेखित होते. भौगोलिक वैशिष्ट्ये आणि निर्मिती नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याचा उगम गोदावरी नदी आणि तिच्या उपनद्यांच्या संगमामुळे झाला आहे. या ठिकाणी बांधण्यात आलेल्या धरणामुळे विस्तीर्ण जलक्षेत्र तयार झाले आणि कालांतराने हे जलक्षेत्र पक्ष्यांसाठी अनुकूल अधिवास बनले. येथे पाणथळ प्रदेश , गवताळ जमीन , लहान बेटं आणि झुडुपं यांचा संगम आढळतो , जो विविध प्रजातींना आकर्षित करतो. ‘महाराष्ट्राचे भरतपूर’ का ? राजस्थानातील केवळादेव राष्ट्रीय उद्यान (भरतपूर) प्रमाणेच ...

मृतांच्या टाळूवरचे विष: २५ गिधाडांचा बळी (दै. सामना उत्सव पुरवणी विशेष लेख)

इमेज
उत्तर प्रदेशच्या दुधवा व्याघ्र प्रकल्पात एकाचवेळी तब्बल २५ गिधाडांचे मृतदेह सापडले आहेत. त्यांचा मृत्यू कशामुळे झाला ? या घटनेची देशभर एवढी चर्चा का होत आहे ? भावेश ब्राह्मणकर एकीकडे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वन्यजीव संवर्धनाचे मोठे दावे केले जातात, दुसरीकडे उत्तर प्रदेशातील दुधवा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधून एक अत्यंत विदारक स्थिती समोर आली आहे. कडाक्याच्या उन्हात , आकाशात उंच भरारी घेणारे आणि निसर्गाचे सफाई कामगार म्हणून ओळखली जाणारी २५ गिधाडे मृतावस्थेत आढळली आहेत. ही गिधाडे हिमालयन ग्रिफन ( Himalayan Griffon) या दुर्मिळ प्रजातीची आहेत. या घटनेने केवळ उत्तर प्रदेशच नव्हे , तर संपूर्ण देशातील पर्यावरणप्रेमी आणि पक्षीशास्त्रज्ञांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दुधवा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील एका शेतात २५ ते २६ गिधाडांचे सांगाडे आणि मृतदेह विखुरलेल्या अवस्थेत सापडले. प्राथमिक तपासणीनुसार , या मृत्यूचे कारण दुय्यम विषबाधा (सेकंडरी पॉयझनिंग) असल्याचे मानले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार , परिसरातील काही भटक्या कुत्र्यांचा मृत्यू झाला होता , ज्यांच्या मृतदेहांमध्ये विष क...