पोस्ट्स

Iran लेबलसह पोस्ट दाखवत आहे

युद्धग्रस्त, शापित अन् अस्वस्थ पश्चिम आशिया (नवशक्ती)

इमेज
युद्धग्रस्त, शापित अन् अस्वस्थ पश्चिम आशिया बॉम्ब वर्षाव, मृत्यूचे तांडव, भयाची दहशत, क्रूरतेची छाया अशा अत्यंत भयावह स्थितीत असलेला पश्चिम आशिया आणखीनच अस्वस्थ झाला आहे. इस्त्राईलच्या गाझावरील हल्ल्यांनी माणुसकीला पार काळीमा फासली आहे. त्यात आता इस्त्राईलने इराणवर हल्ले चढविले आहेत. हे सारे ‘ विनाशकाले विपरीत बुद्धि ’ असेच आहे. भावेश ब्राह्मणकर अन्नाची पाकीटे घेण्यासाठी जिवाच्या आकांताने धावणारे चिमुकले, वृद्ध, महिला अशा साऱ्यांवरच धाडकन बॉम्ब पडतो... कानठळ्या बसवणारा स्फोट होतो... क्षणार्धात सारेच उध्वस्त होते... नियतीच्या दुष्टचक्रामुळे हे सारे घडते आहे का ? असा विचार करणाऱ्यांना हे कुठे ठाऊक आहे की, बेंजामिन नेतन्याहू सारख्या क्रूरकर्म्याचा थयथयाट सुरू आहे ! युद्धोतिहासात आजवर हिटलरच्या अनेक निष्ठूर कहाण्या सांगितल्या जातात. मात्र, इस्राईलचे नेतृत्व करणाऱ्या नेतन्याहू यांनी मानवाधिकारांसह अनेक आंतरराष्ट्रीय नियम आणि कायद्यांचे सर्रास उल्लंघन करीत शस्त्रास्त्रांच्या हल्ल्यांचा सिलसिला कायम ठेवला आहे. विशेष म्हणजे, जगातील १९४ देशांच्या डोळ्यादेखत हे घडते आहे. या सर्व देशातील ...

तिसऱ्या महायुद्धाची वाढती भीती (नवशक्ती)

इमेज
तिसऱ्या महायुद्धाची वाढती भीती  इस्त्राइल-हमास, इस्त्राइल-लेबनॉन, इस्त्राइल-इराण किंवा रशिया-युक्रेन या संघर्षामध्ये दररोज शेकडो निष्पाप मृत्युमुखी पडत आहेत. लहान मुले, स्त्रिया, पुरुष, वृद्ध असे कुणीही अपवाद नाही. विशेष म्हणजे, जगभरातील ७९५ कोटी लोकसंख्या हे सारे निमूटपणे पाहत आहे. भावेश ब्राह्मणकर तब्बल अडीच वर्षांपासून रशिया-युक्रेन तर गेल्या वर्षभरापासून मध्य पूर्वेत इस्त्राईलचा विविध देशांशी हिंसक संघर्ष सुरू आहे. रशिया-युक्रेन युद्धात आतापर्यंत जवळपास १ लाख सैनिक आणि २० हजाराहून अधिक नागरिक ठार झाले आहेत. तर, इस्त्राईलचा विविध देशांशी असलेल्या संघर्षात १० हजाराहून अधिक सैनिक व नागरिकांचा बळी गेला आहे. (हानीची ही आकडेवारी प्रत्यक्षात अधिकच आहे) म्हणजेच जगातील या दोन द्वंद्वामध्ये सव्वा लाखाहून अधिक प्राण गेले आहेत. एवढे होऊनही युद्ध संपण्याची चिन्हे नाहीत. उलट ती भडकतच आहेत. आणखी किती जणांचा जीव घेतला जाईल, हे कुणीही सांगू शकत नाही. ही बाब अतिशय गंभीर आणि चिंताजनक असली तरी जगभरातील १९० हून अधिक देश हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून आहेत. हीच खरी शोकांतिका आहे. आजवरच्या इत...