अध्यक्ष झाल्यापासून ट्रम्प यांनी किती पैसे कमावले? (नवशक्ती विशेष लेख)
ट्रम्प यांनी अवघ्या ३६५ दिवसातच २.२ अब्ज डॉलरची कमाई केली आहे. यासह त्यांनी आणखी काय काय कारनामे केले ते सारेच उघड झाले आहे. थक्क करणारे असेच सगळे आहे. भावेश ब्राह्मणकर अमेरिकेच्या राजकीय आणि धोरणात्मक इतिहासात राष्ट्राध्यक्ष पदावर असताना वैयक्तिक किंवा कौटुंबिक व्यवसायातून नफा कमावण्याचे , अथवा हितसंबंधांच्या संघर्षाचे ( Conflicts of Interest) वाद यापूर्वीही अधूनमधून समोर आले आहेत. परंतु , राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधील आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्याच वर्षात तब्बल १८ , ००० कोटी रुपयांपेक्षा अधिक इतका नफा कमावून सर्व जुने दाखले आणि नैतिक संकेत मोडीत काढले आहेत . आधुनिक जगातील कोणत्याही लोकशाही व्यवस्थेच्या राष्ट्रप्रमुखाने पदावर असताना एवढ्या अवाढव्य प्रमाणावर वैयक्तिक संपत्ती जमा करण्याची ही इतिहासातील पहिलीच घटना ठरावी . न्यूयॉर्क टाईम्स ने संशोधनाच्या आधारे ट्रम्प यांची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. ट्रम्प यांच्या या अभूतपूर्व जागतिक आर्थिक साम्राज्याचा आणि त्यातून निर्माण झालेल्या धोरणात्मक सौदेबाजीचा जो पर्दाफाश झाला आहे , तो केवळ अमेरिकेपुरता मर्याद...