पोस्ट्स

Noon लेबलसह पोस्ट दाखवत आहे

...आणि नद्या वाहत्या झाल्या (चौफेर दिवाळी अंक)

इमेज
पुण्यातली मुळा, मुठा, नाशिकची गोदावरी, मुंबईची मिठी किंवा नागपूरची नाग. राज्यातील जवळपास सर्वच नद्या प्रदूषणाच्या अजस्त्र अजगराने वेढल्या गेल्या आहेत. राज्यातील नद्यांमध्ये ५२ टक्के सांडपाणी हे विनाप्रक्रिया सोडले जाते. वाढते शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे सांडपाणी थेट नदी, नाले आणि तलावांमध्ये मिसळत आहे. यामुळे असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत. पिण्याचे पाणी तसेच शेती, उद्योग व विविध कारणांसाठी रसायनयुक्त पाणी उपलब्ध होत आहे. अस्वच्छ नद्यांमुळे जैविक साखळी नष्ट झाली आहे. तर, अतिक्रमणांमुळे नद्या कोरड्या पडत आहेत. हे वास्तव असले तरी नदी पुनरूज्जीवनाचे उत्तम प्रयत्न ठिकठिकाणी झाले आहेत. त्यावर फारशी चर्चा होत नाही. हे प्रयत्न कुठे आणि कसे झाले यावर टाकलेला हा प्रकाश... भावेश ब्राह्मणकर सिओल शहराच्या मध्यवर्ती भागात पसरलेली दुर्गंधी... सांडपाणी मिश्रीत घाण पाण्याने दुथडी भरलेली नदी... तोंडाला रुमाल किंवा मास्क लावणे बंधनकारक... काँक्रिटचे रस्ते आणि बिल्डींगचे अतिक्रमण... कचरा आणि घाणीचे साम्राज्य... हे असे वातावरण २००३ पर्यंत होते दक्षिण कोरियाची राजधानी असलेल्या सिओलमध्ये. अतिशय प्राच...

चमत्कार! …आणि नदी खळाळून वाहू लागली (सामना - उत्सव पुरवणी)

इमेज
चमत्कार ! … आणि नदी खळाळून वाहू लागली जनता आणि प्रशासन यांनी ठरवलं तर काय होऊ शकतं याचा प्रत्यय सध्या उत्तर प्रदेशात येत आहे. कोरडीठाक झालेली नदी चक्क खळाळून वाहू लागली आहे. मात्र, हे काही एका रात्रीत झालेलं नाही. त्यामागं गेल्या दोन वर्षांचे अथक परीश्रम आहेत. कसं घडलं हे सगळं ? भावेश ब्राह्मणकर सर्वसाधारणपणे पर्यावरण क्षेत्रातील नकारात्मक बातम्याच प्राधान्याने समोर येतात. जसे की, प्रदूषण वाढले, हवामान बदलामुळे एवढे नुकसान झाले, दुष्काळ पडला, झाडे तोडली, जंगल नष्ट झाले, प्राण्यांची संख्या घटली वैगेरे. सकारात्मक घटना किंवा घडामोडींचे प्रमाण अतिशय नगण्य. याची विविध कारणे आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे विकास विरुद्ध पर्यावरण. मात्र, असे चित्र रंगवणे योग्य नाही. शाश्वत विकास याचाच अर्थ पर्यावरणाची काळजी घेत केलेली प्रगती अतिशय प्रभावी ठरते. विविध कारणांनी गाजणाऱ्या उत्तर प्रदेशात एक चांगली घटना घडली आहे. ती म्हणजे, मृत आणि कोरडीठाक झालेली नदी चक्क दुथडी भरून वाहू लागली आहे. या नदीचे नाव आहे नून. यमुनेची उपनदी असलेली ही नदी खळाळत असल्याने हजारो शेतकऱ्यांसाठी सिंचनाचा स्रोत निर्माण झाला...