नौदल अधिकाऱ्यांच्या परिषदेतील ‘सागरमंथन’! (दै. सकाळ)
भारतीय नौदल अधिकाऱ्यांची तीन दिवसीय द्वैवार्षिक विशेष परिषद नुकतीच संपन्न झाली. या परिषदेच्या आयोजनामागे काय हेतू आहे , यंदाच्या परिषदेत काय चर्चा झाली , भारतीय नौदलापुढे काय आव्हाने आहेत , हिंद-प्रशांत क्षेत्रातील सामरिक स्थिती काय आहे , यापुढील काळासाठी नौदलाचे काय नियोजन आहे आदींचा घेतलेला हा धांडोळा.... -- भावेश ब्राह्मणकर -- नौदल कमांडर्सची द्वैवार्षिक परिषद ५ ते ८ मार्च दरम्यान संपन्न झाली. ही परिषद एक संस्थात्मक व्यासपीठ आहे. ज्यात सागरी सुरक्षाविषयक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते. परिषदेचे उद्घाटन सत्र आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू नौकेवर झाले. तर , ७ आणि ८ मार्च रोजी नवी दिल्लीत हायब्रीड स्वरूपात ही परिषद झाली. संरक्षणमंत्री, नौदल प्रमुख , संरक्षण सचिव , नौदलाच्या विविध विभागांचे प्रमुख , नौदल कमांडर , संरक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी आदींनी या परिषदेत सहभाग घेतला. ही परिषद अनेकर्थाने अत्यंत महत्त्वाची आहे. खासकरुन हिंद महासागरच नाही तर हिंद-प्रशांत क्षेत्रातील विविध घडामोडींचा विचार करता. पश्चिम आशिया आणि लगतच्या समुद्रातील अलीकडच्या घटना...