पोस्ट्स

Technology लेबलसह पोस्ट दाखवत आहे

हायटेक तंत्रज्ञानाचाही कुंभ (लोकमत)

इमेज
हायटेक तंत्रज्ञानाचाही कुंभ दर बारा वर्षांनी भरणारा सिंहस्थ कुंभमेळा हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने हायटेक होऊ शकतो. गर्दी नियंत्रणासह अनेक आव्हाने असले तरी यानिमित्ताने मोठी संधीही आहे. ती आपण कशी एन्कॅश करतो, हेच महत्वाचे आहे.     भावेश ब्राह्मणकर प्रयागराजमध्ये नुकताच महाकुंभ संपन्न झाला तर नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये आणखी दोन वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. प्रशासकीय तयारीला वेग आला आहे. या वैश्विक सोहळ्यासाठी कृत्रिम प्रज्ञेसारख्या (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शक्य आहे. कुंभथॉनच्या माध्यमातून देशभरातील विद्यार्थी आणि स्टार्टअपला नाशिकमध्ये आमंत्रित करण्यात आले. त्यात विविध सादरीकरणही झाले. प्रशासनानेही त्यांच्या गरजा आणि मागणी स्पष्ट केली. अत्यंत कल्पक आणि उत्साही तरुण पिढीच्या सहाय्याने कुंभमेळा सकुशल संपन्न होऊ शकतो. गर्दी व्यवस्थापन हे सिंहस्थातील महाकाय आव्हान आहे. जीपीएसला जोडलेल्या मनगटी पट्ट्या (व्रिस्ट बँड) भाविकांच्या हाताला बांधण्याचा सक्षम पर्याय आहे.   कुठल्या भागात किती गर्दी झाली आहे हे कंट्रोल रुमवरील स्क्रीनवर...

कृत्रिम प्रज्ञेच्या वावटळात जग! (नवशक्ती)

इमेज
कृत्रिम प्रज्ञेच्या वावटळात जग ! फ्रान्समधील कृत्रिम प्रज्ञा परिषद... एलन मस्क यांना हवे असलेले चॅटजीपीटी... सॅम अल्टमनचा मस्कला जबर टोला... ५०० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीतून स्टारगेट कंपनीची ट्रम्प यांची घोषणा...अशा प्रकारे कृत्रिम प्रज्ञेच्या वावटळाने जग प्रभावित झाले आहे. आता पुढे काय ? भावेश ब्राह्मणकर गेल्या आठवड्याभरात जगभर ज्या वेगवान घडामोडी घडल्या त्या कृत्रिम प्रज्ञा अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या भोवतीच होत्या. त्यामुळे त्याच्याकडे सगळ्यांच्या नजरा वळल्या आहेत. तसे पाहता आता कुठे कृत्रिम प्रज्ञेचा शिरकाव विविध क्षेत्रात होत आहे. त्याचवेळी वावटळ उठणे स्वाभाविक आहे. ८० ते ९०च्या दशकात असेच वावटळ आले ते कॉम्प्युटरचे. मात्र, कृत्रिम प्रज्ञा जगभर नक्की काय काय घडवेल याचा अंदाज जाणकारांनाही येईनासा झाला आहे. त्यामुळे सध्या घडलेल्या घडामोडींकडे बारकाईने पाहणे आवश्यक आहे. फ्रान्समध्ये कृत्रिम प्रज्ञेची जागतिक परिषद संपन्न झाली. भारत हा सहआयोजक होता. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यास हजेरी लावली. तर, अनेक देशांचे उपाध्यक्ष, नेते, महत्वाचे मंत्री, कृत्रिम प्रज्ञेच्या क...

डीपसीकच्या भूकंपाचे जगभर हादरे! (नवशक्ती)

इमेज
अत्यंत कमी खर्च आणि कालावधीत डीपसीक या कृत्रिम बुद्धिमत्तेवरील तंत्रज्ञानाने जागतिक पातळीवर भूकंप घडविला आहे. त्याचा केंद्रबिंदू चीन असला तरी त्याचे जबर हादरे अमेरिकेसह अनेक देशांना बसले आहेत. हे सगळे कसे झाले ? अचानक की जाणिवपूर्वक ? भारताचे काय ? नजिकच्या काळात काय होणार ? भावेश ब्राह्मणकर डीपसीक हे चॅटबॉट ॲ प अवघ्या काही दिवसातच लाखोच्या संख्येने अमेरिकेत डाऊनलोड झाले आणि एकच गहजब उडाला. विशेष म्हणजे, अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्विकारल्याच्या दिवशीच हे घडावे हा योगायोग होता का ? डीपसीक नक्की काय आहे ? त्याचा एवढा गवगवा का होत आहे ? कृत्रिम बुद्धिमत्तेवरील आणि खासकरुन अमेरिकन दिग्गज कंपन्यांच्या पोटात गोळा का उठला आहे ? हजारो जणांचे कोट्यवधींचे नुकसान कसे झाले ? नजिकच्या काळात आणखी काय काय घडणार आहे ? हे सारे जाणून घेतले नाही तर त्याच्या गंभीर परिणामांना सामोरे जावेच लागेल. जे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी चॅटजीपीटी, गुगल, मेटा सारख्या दिग्गज कंपन्यांना काही वर्षे आणि अब्जावधीची गुंतवणूक करावी लागली त्यांना चिनी डीपसीकने जबरदस्त तडाखा दिला...