पोस्ट्स

Panda लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पाम तेल घ्या आणि.... माकडांबाबत मलेशियाच्या अनोख्या निर्णयाची जगभर चर्चा (अक्षरनामा)

पाम तेल घ्या आणि....   माकडांबाबत मलेशियाच्या अनोख्या निर्णयाची जगभर चर्चा राजकारण, शह, काटशह, कुरघोडी, भेटवस्तू, आमंत्रण, शाही मेजवानी या आणि अशा कितीतरी बाबींचा समावेश परराष्ट्र धोरणात होतो. मात्र, यामध्ये प्राण्यांचेही महत्व मोठे आहे असे कुणी सांगितले तर त्यावर तुमचा विश्वास बसेल का ? पण हे खरे आहे. मलेशियाने तेथील माकडांबाबत घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयामुळे त्याची जगभर चर्चा सुरू झाली आहे. भावेश ब्राह्मणकर दोन देशांचे संबंध सुधारावेत म्हणून क्रीडा स्पर्धांचे आयोजन , नेत्यांच्या गाठी-भेटी , शिष्टमंडळांचे दौरे , सांस्कृतिक कार्यक्रम यासारखे विविध प्रकारचे फंडे वापरले जातात. मात्र , हरिण , बकरी घ्या आणि त्याच्या बदल्यात पांडा द्या असे कुणी सांगितले तर ? किंवा पाम तेल खरेदी करा आणि माकड भेट घ्या अशी ऑफर मिळाली तर ? हे तुम्हाला नक्कीच विश्वासार्ह वाटणार नाही. पण , ही बाब खरी आहे. दोन देशात सौहार्दाचे वातावरण निर्माण व्हावे , त्यांच्या संबंधांना बळकटी मिळावी म्हणून परराष्ट्र धोरणात पक्षी , प्राण्यांच्या आदान प्रदानाला विशेष महत्त्व आहे. मलेशिया सरकारने तेथील ओरंगुटन माकडांबा...