‘ऑपरेशन सिंदूर’ने दिलेला जबर धडा (नवशक्ती)
‘ ऑपरेशन सिंदूर ’ ने दिलेला जबर धडा ‘ आयर्न डोम ’ या अत्याधुनिक प्रणालीद्वारे इस्त्राईलने केलेला बचाव... भारताने पाक दहशतवाद्यांविरुद्ध राबविलेले ‘ ऑपरेशन सिंदूर ’ ... युक्रेनने ड्रोनद्वारे रशियाच्या ३०हून अधिक लढाऊ विमानांची केलेली राखरांगोळी... युद्धाचे स्वरुप बदलले आणि हवाई संरक्षण प्रणालीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. असे असताना भारतीय वायूदलाची सद्यस्थिती आणि भविष्य काय आहे ? भावेश ब्राह्मणकर समोरासमोर उभे ठाकून केल्या जाणाऱ्या पारंपरिक युद्धाचे दिवस कधीच मागे सरले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निर्मित झालेल्या नवनवीन आयुधांद्वारे लढाई करण्याचे दिवस आले आहेत. शत्रूला कळणारही नाही अशा पद्धतीने त्याच्यावर अचानक हल्ले करण्याची प्रणाली विकसित झाली आहे. खासकरुन ड्रोन, मानव विरहित विमान (युएव्ही), क्षेपणास्त्र आदींच्या माध्यमातून हवाई मार्गे अचूक हल्ले करता येणे शक्य आहे. गेल्या काही दिवसात जगभरामध्ये ज्या काही घटना घडल्या त्यावर एक नजर टाकणे आवश्यक आहे. पहिली घटना पश्चिम आशियातली. हमास या संघटनेने चहूबाजूने इस्त्राईलवर क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले चढवले. म...