पोस्ट्स

IISWC लेबलसह पोस्ट दाखवत आहे

काळ्या आईची काळजी करणारी संस्था

इमेज
मृदा संरक्षण शाश्वत विकास साधायचा असेल तर माती आणि पाणी यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. डेहराडून येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सॉईल अँड वॉटर कॉन्झर्वेशन ही संस्था देशभरात अभूतपूर्व असे काम करते आहे. त्याची दखल जागतिक बँकेसह अनेक संघटनांनी घेतली आहे. जाणून घेऊ या ऐतिहासिक संस्थेविषयी... भावेश ब्राह्मणकर भारतीय भूभागाचे अनेकविध वैशिष्ट्य आहेत. डोंगरररांगा , दऱ्या , खोऱ्या , वाळवंट , पाणथळ जमिनी ,  घनदाट जंगल अशी बहुविध प्रकारची भौगोलिकता आहे.  तसेच ,  मान्सून सारख्या हवामानातील सर्वाम मोठ्या आणि महत्त्वपूर्ण घटकाचा देशावर विशिष्ट परिणाम होत असतो. म्हणजेच ,  एखाद्या भागात जोरदार पाऊस सतत होत असेल तर त्याचा मोठा परिणाम त्या भागातील मातीवर होतो. डोंगर उतारावरुन पाणी मोठ्या प्रमाणात वाहते. त्यामुळे तेथील मातीही वाहून जाते. यामुळे तेथील जमिनीची मोठी धूप होते. यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. खासकरुन डोंगर उतारावर शेती करणाऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहते. मग ,  अशावेळी काय करावे ?  जमिनीचा पोत कसा सांभाळायचा ?  तेथे कुठल्या पिकांची लागवड करायला हवी ?...