पोस्ट्स

efforts लेबलसह पोस्ट दाखवत आहे

जगभरातील निसर्ग वेडे (दिवाळी अंक - आनंद तरंग)

इमेज
जगभरातील निसर्ग वेडे निसर्गाशी नातं जोडणाऱ्या आणि केवळ परिसरातील रहिवाशीच नाही तर संपूर्ण जगासमोरच आदर्श निर्माण करणाऱ्या या निसर्गवेड्यांची ही यशोगाथा. अनेकांसाठी प्रेरणादायी, मार्गदर्शक आणि दीपस्तंभासारखी... भावेश ब्राह्मणकर चेन्नईचे बर्ड मॅन जोसेफ शेखर हे चेन्नईतील कॅमेरा दुरुस्त करणारे व्यावसायिक. २००४ मध्ये त्सुनामीच्या वाताहतीमुळे पोपटाची एक जोडी शेखर यांच्या घरालगत घुटमळत होती. थकलेली आणि भूकेने व्याकूळ झालेल्या त्या जोडीकडे पाहून शेखर यांना थेट रडूच कोसळले. त्यांनी तातडीने तांदळाचे दाणे घेतले आणि त्यांच्यासमोर ठेवले. ती जोडी दाण्यांवर तुटून पडली. हे पाहून शेखर यांनी ठाम निश्चय केला तो पक्ष्यांना अन्न देण्याचा. दररोज पहाटे ते घराच्या गच्चीवर तांदळाचे दाणे टाकू लागले. त्या दोन पोपटांबरोबरच इतरही पोपट, कबुतर व पक्षी तेथे येऊ लागले. हे पाहून शेखर यांचा उत्साह वाढतच गेला. आता तर त्यांच्या गच्चीवर तब्बल ४ हजाराहून अधिक पक्षी दररोज जमतात. शेखर दररोज सकाळी साडेचार वाजता उठतात. तब्बल ६० किलो तांदूळ उकडवतात. हाच तांदूळ ते गच्चीवरील  लाकडी फळ्यांवर टाकतात. पक्षी यायला सुरुवात ह...