पोस्ट्स

War लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नृशंस हत्यांचा कळस अन बेदरकार नेतन्याहू (नवशक्ती)

इमेज
नृशंस हत्यांचा कळस अन बेदरकार नेतन्याहू गेल्या २३ महिन्यांपासून गाझा पट्टीत सुरू असलेला नरसंहार कल्पनेपलिकडचाच आहे. जगाच्या इतिहासात हिटलरचे क्रौर्य कुख्यात आहे. इस्राईलचे सर्वेसर्वा बेंजामिन नेतन्याहू यांनी आता त्यापुढची पायरी गाठून मानवतेलाच काळिमा फासली आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण जग निपचितपणे याचे साक्षीदार बनत आहे. भावेश ब्राह्मणकर अन्नासाठी तडफडणारी लहान मुले... औषधांसाठी कासावीस झालेले रुग्ण... सत्य परिस्थिती जगाला दाखविण्यासाठी धडपडणारे पत्रकार... कुणीतरी सहाय्य करेल या आशेने आसुसलेले ज्येष्ठ नागरिक... अन्नाची पाकिटे शोधण्यासाठी भटकणाऱ्या गर्भवती महिला... औषधोपचाराच्या चिंतेत असलेले मधुमेह, रक्तदाब आणि दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्ण... भळभळती जखम घेऊन हिंडणारे जखमी... सैरावैरा धावणारे तरुण आणि प्रौढ... या साऱ्यांवर बेछूट गोळ्या झाडल्या जात आहेत किंवा बॉम्ब टाकून त्यांची निर्दयीपणे हत्या केली जात आहे. ही काही काल्पनिक किंवा इतिहासातील घटना नाही. गाझा पट्टीमध्ये दिवसाढवळ्या आणि बिनदिक्कतपणे हा सारा नंगानाच इस्राईलकडून सुरू आहे. याचे नेतृत्व करीत आहेत नृशंस हत्यांचे शिरोमणी बेंज...

अमेरिकेला भारत काय प्रत्युत्तर देणार? (नवशक्ती)

इमेज
अमेरिकेला भारत काय प्रत्युत्तर देणार ? ‘ भारतावर महासंकट घोंघावत आहे ’ , असे याच स्तंभात तीन आठवड्यांपूर्वी मांडल्यानंतर आता त्याचा प्रत्यय येऊ लागला आहे. २५ टक्के आयात शुल्क आणि दंडाची घोषणा करून ट्रम्प यांनी मोठा गहजब उडवून दिला आहे. भावेश ब्राह्मणकर जगभरात दबदबा, धाकदपटशा निर्माण करणारे आणि मनमानीपणा, लहरी, तामसी तसेच तर्कट म्हणून प्रसिद्ध असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर भारतीय वस्तूंवर थेट २५ टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे ते केवळ एवढ्यावरच थांबलेले नाहीत. रशियाकडून   तेल आणि लष्करी सामुग्री भारत खरेदी करीत असल्याने वाढीव शुल्क आकारण्याचेही जाहीर करून टाकले आहे. भारत-अमेरिका व्यापार करार शिष्टमंडळाची बोलणी अद्याप पूर्ण झालेली नाही. चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या आहेत. सहावी फेरी ऑगस्टमध्ये प्रस्तावित आहे. अशातच ट्रम्प यांनी शुल्काचा गोळा टाकून खळबळ उडवून दिली आहे. एवढ्यावरच हे थांबलेले नाही तर ट्रम्प यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. ते म्हणतात की, ‘ अमेरिका लवकरच पाकिस्तानबरोबर तेलसाठे विकसित करीत आहे. कदाचित एक दिवस तेथून भारताला तेल विकले जाईल...

युद्धग्रस्त, शापित अन् अस्वस्थ पश्चिम आशिया (नवशक्ती)

इमेज
युद्धग्रस्त, शापित अन् अस्वस्थ पश्चिम आशिया बॉम्ब वर्षाव, मृत्यूचे तांडव, भयाची दहशत, क्रूरतेची छाया अशा अत्यंत भयावह स्थितीत असलेला पश्चिम आशिया आणखीनच अस्वस्थ झाला आहे. इस्त्राईलच्या गाझावरील हल्ल्यांनी माणुसकीला पार काळीमा फासली आहे. त्यात आता इस्त्राईलने इराणवर हल्ले चढविले आहेत. हे सारे ‘ विनाशकाले विपरीत बुद्धि ’ असेच आहे. भावेश ब्राह्मणकर अन्नाची पाकीटे घेण्यासाठी जिवाच्या आकांताने धावणारे चिमुकले, वृद्ध, महिला अशा साऱ्यांवरच धाडकन बॉम्ब पडतो... कानठळ्या बसवणारा स्फोट होतो... क्षणार्धात सारेच उध्वस्त होते... नियतीच्या दुष्टचक्रामुळे हे सारे घडते आहे का ? असा विचार करणाऱ्यांना हे कुठे ठाऊक आहे की, बेंजामिन नेतन्याहू सारख्या क्रूरकर्म्याचा थयथयाट सुरू आहे ! युद्धोतिहासात आजवर हिटलरच्या अनेक निष्ठूर कहाण्या सांगितल्या जातात. मात्र, इस्राईलचे नेतृत्व करणाऱ्या नेतन्याहू यांनी मानवाधिकारांसह अनेक आंतरराष्ट्रीय नियम आणि कायद्यांचे सर्रास उल्लंघन करीत शस्त्रास्त्रांच्या हल्ल्यांचा सिलसिला कायम ठेवला आहे. विशेष म्हणजे, जगातील १९४ देशांच्या डोळ्यादेखत हे घडते आहे. या सर्व देशातील ...

बदलते तंत्र, नवे रणांगण! (नवशक्ती)

इमेज
बदलते तंत्र , नवे रणांगण! भारत-पाकिस्तान यांच्यात वाढलेला तणाव आणि याचदरम्यान होणारा विविध अस्त्र-शस्त्रास्त्रांचा वापर सध्या विशेष चर्चेचा बनला आहे. काळाच्या ओघात जसे रणांगण बदलले आहे तसे तंत्रही. म्हणूनच ते समजून घेणे अगत्याचे आहे. भावेश ब्राह्मणकर बलाढ्य मुघलशाही , आदिलशाही आणि कुतुबशाहीला तोंड देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावासारखे शस्त्र परजले. त्याचा एवढा प्रभावी वापर केला की , हजारो आणि लाखोच्या संख्येने असलेल्या फौजा केवळ शेकडोने असलेल्या मावळ्यांनी हादरवून सोडल्या. पारंपरिक शस्त्रांना फाटा देत वाघनखे , दगड , गोफण , अग्नी अशा कल्पक अस्त्रांचा चपखल उपयोग महाराजांनी केला. परिणामी , तिनशे ते चारशे वर्षांच्या साम्राज्याला शिवाजी राजांनी अवघ्या काही दशकातच सुरूंग लावला. म्हणजेच पारंपरिक युद्धाला तोंड देण्यासाठी महाराजांनी नवा आयाम दिला. त्यानंतर भारतात प्रवेश केलेल्या ब्रिटीश , पोर्तुगीज , डच , फ्रेंच आदींनी त्यांच्याकडील बंदुकांसह तोफांचा वापर करुन पुढील पिढीच्या शस्त्रास्त्रांची ओळख सर्वांना करुन दिली. तेव्हापासून आता २१व्या शतकातील तिसऱ्या दशकात युद्ध तंत्रात ...

सर्जिकल स्ट्राईक, युद्ध की आणखी काही? (नवशक्ती)

इमेज
पहलगाम हल्ला लेख ५ सर्जिकल स्ट्राईक, युद्ध की आणखी काही ? पहलगाम हल्ल्यानंतर भारतवासियांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. ‘ होऊन जाऊ द्या एकदाचे ’ , ‘ पीओके आता घेऊनच टाका ’ , ‘ करा एक घाव आणि दोन तुकडे ’ अशा घोषणा आणि सोशल पोस्टचा सुळसुळाट आहे. भारत सरकार आणि सैन्य दलांवर कमालीचा दबाव निर्माण झाल्याने आता काय होणार ? सर्जिकल स्ट्राईक, युद्ध की आणखी काही ? भावेश ब्राह्मणकर काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात जेवढी संतापाची लाट उसळली आहे तेवढीच भारत सरकारवरील अपेक्षांची सुद्धा. बहुमतात असलेले एनडीए सरकार आता कठोर निर्णय घेईल आणि सैन्य दले अचूक कारवाई करतील, असा विश्वास भारतीयांना आहे. पुलवामा हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईकद्वारे पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची स्थळे उद्धवस्त करण्यात आली. आताही तशाच प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक होणार का ? की पाकव्याप्त काश्मीर पुन्हा आपल्या ताब्यात मिळविण्यासाठी युद्ध छेडले जाणार ? की पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा काही तरी जबरदस्त संघर्ष सुरू होणार ? अशा बहुविध चर्चा सुरू झाल्या आहेत. आततायी माध्यमांकडून अतिरंजित वृत्...

पाक व्याप्त काश्मीर मध्ये भारताचा तिरंगा फडकणार? (पहलगाम हल्ला लेख ४)

इमेज
पहलगाम हल्ला लेख ४ पाक व्याप्त काश्मीर भारतात येणार ? पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कठोर कारवाई करावी आणि पाक व्याप्त काश्मीर (पीओके) पुन्हा भारतात घ्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे. भारत अशा प्रकारची रणनिती आखणार का ? पीओके पुन्हा भारतात येणार का ? सद्यस्थितीत ते शक्य आहे का ?     भावेश ब्राह्मणकर काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संपूर्ण भारतात संतापाची लाट आहे. भारताने आता पाकिस्तानला धडा शिकवावाच आणि पाक व्याप्त काश्मीर पुन्हा भारतात आणावे, अशी मागणी जोर धरु लागली आहे. यापूर्वी दहशतवादी हल्ल्याचे प्रत्युत्तरादाखल भारताने सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानातील दहशतवाद्यांची स्थळे उद्धवस्त केली आहेत. त्यामुळे भारत सरकारकडून देशवासियांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात हे शक्य आहे का, हे पहायला आहे. पाक व्याप्त काश्मीरचा इतिहास नेमका काय आहे हे आधी समजून घ्यायला हवे. १९४७ मध्ये ब्रिटीशांनी भारत आणि पाकिस्तान यांना स्वतंत्र देशाचा दर्जा देऊन काढता पाय घेतला. त्यावेळी ब्रिटिशांनी तत्कालिन संस्थानांवरील आपला दावा सोडला. या संस्थानांनी भारत किंव...