पोस्ट्स

Relations लेबलसह पोस्ट दाखवत आहे

चीनच्या जवळ जाणे कितपत फायद्याचे? (नवशक्ती)

इमेज
चीनच्या जवळ जाणे कितपत फायद्याचे ? डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफचा भोकाडा दाखविल्याने चीनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न भारत करीत आहे. रशिया-चीन-भारत अशी आघाडी जगभर दबदबा निर्माण करेल आणि अमेरिकेलाही शह देईल. प्रत्यक्षात हे होईल का ? भावेश ब्राह्मणकर चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी भारत दौऱ्यावर आले. परराष्ट्र मंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत त्यांनी चर्चा केली. यी यांच्या आमंत्रणानुसार ऑगस्टच्या अखेरीस चीनमध्ये होणाऱ्या शांघाय शिखर परिषदेला पंतप्रधान मोदी जाणार आहेत. खासकरून अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय मालावर (२५ अधिक २५ असे एकूण) ५० टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर भारत चीनशी जवळीक करीत असल्याचे बोलले जात आहे. ही सलगी कितपत योग्य आहे ? यातून काय साध्य होणार ? भारताला त्याचा अधिक फायदा आहे की चीनला ? आजवरचा इतिहास काय सांगतो ? ट्रम्प हे तोंडाळ नेते असल्याने त्यांना प्रत्युत्तर देणे किंवा उघडपणे कुठलेही भाष्य करणे भारताने टाळले आहे. अन्य पर्यायांची चाचपणी भारताने सुरू केली आहे. ...

ट्रम्प-मोदी भेटीने भारताच्या पदरात काय? (नवशक्ती)

इमेज
ट्रम्प-मोदी भेटीने भारताच्या पदरात काय ? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा किती यशस्वी झाला ? भारताला फायदा की तोटा ? अमेरिकेची आगमी काळासाठी भूमिका काय ? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी काही संकेत दिलेत तर काही बाबी अगदीच स्पष्ट झाल्या आहेत. भावेश ब्राह्मणकर अमेरिकन अध्यक्षपदाची सूत्रे ट्रम्प यांनी घेतल्यानंतर महिना होत नाही तोच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा ठरला. ट्रम्प यांच्याशी चर्चा, वाटाघाटी निश्चित झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. फ्रान्समधील परिषदेनंतर मोदी अमेरिकेत दाखल झाले. व्हाईट हाऊसमधील स्वागत, चर्चा, पत्रकार परिषद तसेच ‘ मिस्टर प्रायमिनिस्टर यू आर ग्रेट ’ आणि ‘ अ ग्रेट फ्रेंड ऑफ माइन ’ अशा प्रकारचे कौतुकोद्गार ट्रम्प यांनी मोदींबाबत काढले. स्वाभाविकच हे सर्व माध्यमात आले. जगातील पहिल्या आणि पाचव्या क्रमांकावरील अर्थव्यवस्थेच्या प्रमुखांची भेट अनेक देशांसाठी उत्सुकतेची होती. यातून मिळणारे संकेत आणि संदेशही महत्वाचे आहेत. मोदी-ट्रम्प यांच्यात विविध विषयांवर खल झाला. आता त्याचे भारतावर काय आणि किती परिणाम होणार ? हे जा...

भारत-कॅनडातील वादाचा नवा अंक (नवशक्ती)

इमेज
भारताने कॅनडातील उच्चायुक्तांसह सहा अधिकाऱ्यांना तडकाफडकी मायदेशी बोलवून घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर, कॅनडाच्या भारतीय दुतावासातील सहा अधिकाऱ्यांना भारत सोडून जाण्याचे फर्मान जारी केले आहे. दोन्ही देशातील हा तणाव म्हणजे नवा अंक आहे. मात्र, या वादाला वेगळीच किनार आहे.   भावेश ब्राह्मणकर प्रत्येक देशातील दुतावास हे परराष्ट्र संबंध, व्यापार, मुत्सद्देगिरी आणि अनेक अर्थाने महत्वाचे असते. हे दुतावास दोन्ही देशांसाठी दुवा तर बनतेच पण अधिकाऱ्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे परराष्ट्र संबंधांना कलाटणी देणारेही ठरते. हे सारे सांगायचे कारण म्हणजे भारत आणि कॅनडा यांच्यात निर्माण झालेला तणाव. गेल्या वर्षभऱापासून दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले. आता त्याचा पुढचा अंक पहायला मिळत आहे. भारताने कॅनडामधील दुतावासात कार्यरत असलेल्या उच्चायुक्तांसह सहा अधिकाऱ्यांना १९ ऑक्टोबरपर्यंत भारतात येण्याचे सांगितले आहे. तर, नवी दिल्लीत असलेल्या कॅनडा दुतावासातील उच्चायुक्तांसह सहा अधिकाऱ्यांना तातडीने देश सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत. दोन्ही देशातील संबंध एवढे विकोपाला का गेले हे पाहणे महत्त्वाचे आहे....

या शेख हसिनांचे करायचे काय? (नवशक्ती)

इमेज
  या शेख हसिनांचे करायचे काय ? बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसिना भारतात येऊन आता एक महिना होईल. त्यांना दुसऱ्या देशात पाठवायचे की भारतातच राहू द्यायचे की पुन्हा बांगलादेशात धाडायचे यावर अजून निर्णय झालेला नाही. हा पेच भारताला लवकरात लवकर सोडवावा लागेल. राजकीय आश्रय देण्याची किंमत भारताला यापूर्वी जबर चुकवावी लागली आहे. त्यामुळे इतिहासातून धडा घेत भारताला लवकरात लवकर निर्णय घ्यावाच लागेल. भावेश ब्राह्मणकर बांगलादेशच्या तत्कालिन पंतप्रधान शेख हसिना यांना अभूतपूर्व परिस्थितीमध्ये पलायन करणे भाग पडले. अत्यंत कमी वेळ असल्याने त्यांनी भारताकडे मदत मागितली. त्यामुळेच त्या हवाई मार्गे थेट भारतात दाखल झाल्या. त्यांच्या राजकीय आश्रयाला आता एक महिना होत आला आहे. तर तिकडे बांगलादेशात नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन झाले आहे. तरुण आणि जनतेमधील असंतोष हळूहळू शमला आहे. मात्र, हसिना यांच्यावर त्यांचा रोष कायम आहे. हसिना यांना भारताने आश्रय दिला आणि भारतासोबत त्यांचे घनिष्ट संबंध राहिले आहेत. त्यामुळे संतप्त बांगलादेशी युवक भारतविरोधी घोषणा दे...

पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया-युक्रेन युद्ध थांबवणार? (नवशक्ती)

इमेज
पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया-युक्रेन युद्ध थांबवणार? तब्बल अडीच वर्षांपासून युद्धाने होरपळणाऱ्या युक्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भेट देत आहेत. सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतर स्वतंत्र झालेल्या युक्रेनमध्ये भारतीय पंतप्रधान प्रथमच जात आहेत. गेल्या महिन्यात रशियाला जाऊन आलेल्या मोदींनी युक्रेनचा दौरा करण्याचा निर्णय का घेतला ? यातून काय साध्य होणार आहे ? जागतिक पातळीवर कुठला संदेश जाणार आहे ? की रशिया-युक्रेन युद्ध मोदींकडून थांबवले जाणार आहे ? भावेश ब्राह्मणकर तिसऱ्यांदा सत्तेत विराजमान झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम रशियाचा दौरा केला. त्यानंतर आता ते युक्रेनच्या भेटीवर आले आहेत. हा लेख आपण वाचत असताना मोदी युक्रेनमध्ये असणार आहेत. पोलंड आणि युक्रेन या देशांच्या अधिकृत भेटींसाठी रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि पोलंड दरम्यान असलेल्या राजनैतिक संबंधांना ७० वर्षे पूर्ण होत असताना माझा हा पोलंड दौरा होत आहे. पोलंड हा देश मध्यवर्ती युरोपातील महत्त्वाचा आर्थिक भागीदार आहे. लोकशाही आणि बहुपक्षीयता यांच्याप्रती आपली परस्पर कटिबद्धता आपल्य...

बांगलादेशच्या अस्थैर्याला कोण जबाबदार? पाक, चीन की भारत? (नवशक्ति)

इमेज
बांगलादेशच्या अस्थैर्याला   कोण जबाबदार ? पाक, चीन की भारत ? हेडिंग वाचून कदाचित दचकला असाल ना ! बांगलादेशमध्ये झालेले हिंसक आंदोलन, परागंदा झालेल्या पंतप्रधान, अस्थिर सरकार, लष्करी राजवट हे सारेच अनपेक्षित नक्कीच नाही. गेल्या काही महिने आणि दिवसातील घडामोडींमुळे ते अधिकच ठळक झाले होते. पाकिस्तान व चीनच्या साथीने हे घड(व)त गेले. तर, बांगलादेश व भारताने त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. भावेश ब्राह्मणकर शेजारी राष्ट्र असलेल्या बांगलादेशमध्ये दोन दिवसांपूर्वी अभूतपूर्व अशा घडामोडी घडल्या. तरुण आणि नागरिकांच्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधान शेख हसिना यांच्यावर थेट मायदेशातून पलायन करण्याची नामुष्की ओढावली. लष्कराकडे सर्व सूत्रे आली आहेत. आता हंगामी सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तेथील परिस्थिती चिघळेल की शमेल हे यथावकाश स्पष्ट होईलच. मात्र, तेथील ही सद्यस्थिती का आणि कशी निर्माण झाली ? तसेच त्यास कोण कारभीणूत आहे ? याचा वेध घेणे अगत्याचे आहे. दक्षिण आशियातील भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये अस्थिर सरकार, असंतोष, हिंसक आंदोलने, हुकुमशाही आणि लष्करी वरचष्मा दिसून येतो....