तुमच्या टूथपेस्टमध्ये आहे का हा घातक घटक? (सामना उत्सव पुरवणी)

घातक मायक्रोबिडस

घराघरात वापरल्या जाणाऱ्या टूथपेस्ट आणि सौंदर्य प्रसाधनांमध्ये घातक घटक असल्याचे कुणी सांगितले तर तुमचा विश्वास बसेल? पण हे खरे आहे. घातक असलेल्या या घटकावर बंदी नसल्यानेच या उत्पादनांच्या वेष्टनावर तो घटक असल्याचे नमूदही केलेले आहे. तो घटक आहे मायक्रोबिडस. अर्थात कृत्रिम सूक्ष्म जीवाणू. अत्यंत सूक्ष्म स्वरुपाचा हा घटक चेहरा, त्वचा किंवा दातांवरील मृत पेशींना काढून टाकण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो. त्यामुळेच त्याचा वापर वाढला आहे. मात्र, हा घटक अतिशय घातक असल्याची बाब विविध संशोधनांमधून सिद्ध झाली आहे. अनेक देशांनी त्यावर बंदी घातली आहे. पण, भारतात नाही. 

पॉलीइथिलीनपासून बनलेले हे मायक्रोबिडस म्हणजे प्लास्टिकचे सूक्ष्म तुकडेच. त्वचा, दात, चेहरा धूतल्यानंतर मायक्रोबिडस पाण्यात जातात. तेथूनच ते सांडपाण्यात मिसळतात. हेच सांडपाणी अनेक शहरांमधील नद्या, नाले यांच्यात सोडले जाते. मायक्रोबिडसचे विघटन होत नसल्याने ते पाण्यात किंवा वातावरणात तसेच राहतात. हेच दूषित पाणी शेतीसह अन्य ठिकाणी वापरले जाते. सांडपाण्याचा पुनर्वापर केला जातो. तेव्हाही हे घटक तसेच राहतात. मायक्रोबिडसमुळे नदी पात्राचेही आतोनात प्रदूषण होते. दृष्य स्वरुपाचे नसलेले हे मायक्रोबिडस अतिशय धोकादायक आहेत.

--

bhavbrahma@gmail.com

संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र संबंध आणि पर्यावरणाचे अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार. मो. 9423479348

--

आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा

--

Please Follow me on :

WhatsApp Channel  - https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v

Facebook   - www.facebook.com/BhaveshBrahmankar

X (Twitter)  - www.twitter.com/BhavBrahma

Instagram   - https://www.instagram.com/bhavbrahma

Blog            - https://bhavbrahma.blogspot.com/

--

Environment, Microbeads, Synthetic Polymer Particles, Pollution, Water, Ban, Cosmetic, Toothpaste, Facewash,   


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे हार्दिक निमंत्रण

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)

तब्बल १९ देशांच्या एकजुटीने चीनला धडकी (नवशक्ती)