लहान मुलांचा मोबाईल, टीव्ही, टॅबवरील स्क्रीन टाईम कमी करणे अतिशय आव्हानात्मक झाले आहे. मात्र, जगातील सर्वाधिक तंत्रज्ञानाधिष्ठित असलेल्या चीनने यावर भारी तोडगा काढला आहे. काय आहे तो ? इतर देशही तसे करू शकतील का ? भावेश ब्राह्मणकर लहान मुलांच्या हातातील मोबाईल कसा सोडवायचा हा यक्षप्रश्न केवळ भारतातच नाही तर जगभर आहे. ही समस्या खरं तर दिवसागणिक उग्र होत आहे. जेवणापासून रात्री झोपेपर्यंत लहान मुले मोबाईलच्या आहारी गेलेली पहायला मिळतात. त्याचा परिणाम त्यांच्या आहार, शिक्षण, अभ्यास, शारीरीक क्षमता, झोप आदींवर झाला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी नानाविध प्रयोग केले जात आहेत. मात्र, चीनने या क्षेत्रातही आघाडी घेतल्याचे पहायला मिळत आहे. “ अधिक झोप – कमी स्क्रीन वेळ” हे राष्ट्रीय धोरणच चीनने जाहीर केले आहे. त्याची जागतिक पातळीवर मोठी चर्चा होत आहे. जगातील सर्वाधिक विद्यार्थीसंख्या असलेल्या चीनने प्राथमिक ते माध्यमिक स्तरावर या धोरणांतर्गत अनेक अमुलाग्र बदल केले आहेत. त्याची दखल सर्वांनीच घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांवरील वाढता अभ्यासाचा बोजा , डिजिटल व्यसन , मानसिक ताण , झोपेच...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा