पुस्तक प्रकाशन समारंभ : अक्षरशः भारावून गेलो
भावेश ब्राह्मणकर, नाशिक
‘अरुणोदय’ या माझ्या पहिल्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ शुक्रवार, २७ फेब्रुवारी
रोजी कृर्तकोटी सभागृहात संपन्न झाला. या सोहळ्यास लाभलेले मान्यवर, रसिकांची मोठ्या
संख्येने उपस्थिती आणि कार्यक्रमानंतर येणारे फोन व मेसेज. मी अक्षरशः भारावून
गेलो आहे.
संरक्षण
क्षेत्रातील दिग्गज, चिनी भाषा तज्ज्ञ व उपग्रह छायाचित्र विश्लेषक कर्नल विनायक
भट सर यांच्या हस्ते प्रकाशन झाले. ते खास भूज येथून कार्यक्रमासाठी आले. मातोश्रींची
प्रकृती ठीक नसल्याने व्हाईस अडमिरल सुनील भोकरे सर उपस्थित राहू शकले नाही मात्र
त्यांनी सतत विचारपूस केली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ पत्रकार व संपादक
श्री. सुरेश भटेवरा सर यांनी भूषविले. तब्ब्येत बरी नसतानाही ते कार्यक्रमास आले. (समारंभातही
त्यांना खोकल्याचा त्रास होतच होता.) कुसुमाग्रज प्रतिष्ठान अभ्यासवृत्ती समितीचे
प्रमुख प्रा. हर्षवर्धन कडेपूरकर, दिलीपराज प्रकाशनचे संचालक श्री. मधुर बर्वे,
पिताश्री वसंतराव ब्राह्मणकर हे सुद्धा व्यासपीठावर होते. माझे प्रिय मित्र व सिम्बायोसिस
कॉलेजचे प्राध्यापक डॉ. प्रसाद जोशी यांनी बहारदार सूत्रसंचलन केले. मित्रवर्य व दै.
नवभारतचे ब्युरो चीफ श्री. गौतम संचेती यांनी प्रास्ताविक केले. माझी लाडकी कन्या
आभा हिने पाहुण्यांचा परिचय करून दिला. जो या सोहळ्यात सर्वाधिक चर्चेचा
केंद्रबिंदू ठरला. ती केंद्रीय विद्यालयात शिक्षण घेते आणि तिच्या शाळेत मराठी
विषय शिकविला जात नसतानाही तिचे अस्खलित बोलणे ऐकून व पाहून सारेच अवाक झाले.
म्हणूनच मान्यवरांसह उपस्थितांनी कौतुकाची थाप दिली. आकाशवाणीच्या निवेदिका व
शिक्षीका सौ. वैशाली देवळे यांनी पुस्तकातील एका प्रकरणाचे उत्कृष्ट अभिवाचन केले.
बंधू श्री. अनंत ब्राह्मणकर यांनी आभार मानले.
‘लाभले आम्हास भाग्य’ या गीताने कार्यक्रमास सुरूवात झाली. कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची
जयंती आणि मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून समारंभ आयोजित केला होता. कुसुमाग्रजांच्या
प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने मान्यवर व्यासपीठावर स्थानापन्न
झाले. त्याच दिवशी आणि त्याच वेळी महाराष्ट्र सरकारच्या पुढाकाराने नाशकात विश्व
मराठी संमेलनाचा उदघाटन सोहळा होता. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सहा मंत्री असतानाही
माझ्या पुस्तक प्रकाशनासाठी नाशिककर रसिक व माझ्यावर प्रेम करणारे मोठ्या संख्येने
उपस्थित राहिले. मला वाटतं हीच माझी कमाई आहे.
विशेष
उपस्थितांमध्ये ज्येष्ठ लेखिका व माझ्या गुरू डॉ. वृन्दा भार्गवे, कुसुमाग्रज
प्रतिष्ठानचे सल्लागार व ज्येष्ठ नाटककार श्री. लोकेश शेवडे, शंकराचार्य न्यासाचे
विश्वस्त व माझे मार्गदर्शक श्री प्रमोद भार्गवे, ग्रेप काऊंटीचे संचालक व बांधकाम
व्यावसायिक श्री. किरण चव्हाण, एमराल्ड पार्क हॉटेलचे संचालक श्री. तेज टकले,
आर्किटेक्ट सौ. राखी टकले, ठक्कर बिल्डर्सचे संचालक श्री. जितूभाई ठक्कर, नगरसेविका
डॉ. हेमलता पाटील, अशोका बिल्डकॉनचे संचालक श्री. संजय लोंढे, नाशिक आकाशवाणीचे
केंद्र संचालक श्री. कृष्णा शिंदे, सकाळचे संपादक श्री. अभय सुपेकर, लोकमतचे
संपादक श्री. अभिजीत कुलकर्णी, वृत्त संपादक श्री. संजय पाठक, भ्रमरचे संपादक श्री
चंदुलाल शाह, कार्यकारी संपादक हितेश शाह, वृत्त संपादक श्री. सुधीर कुलकर्णी, दै.
महासागरचे संपादक श्री. जयंत महाजन, वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्री. श्रीकांत बेणी,
कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचे जनसंपर्क अधिकारी श्री. विकास भुजबळ, रेडिओ
मिर्चीचे आरजे भूषण, स्टेशन हेड श्री सोमनाथ शिंदे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री.
रवींद्र अमृतकर, आकाशवाणीच्या निवेदिका सौ. सुप्रिया देवघरे, विशाल भुजबळ, मधुरा
गोरे, स्वाती साखरे, स्वामी विवेकानंद केंद्राचे नाशिक प्रमुख जयंत दीक्षित, भटाई
शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. बी एस वाणी, ज्येष्ठ विधीज्ञ धर्मेंद्र चव्हाण, ड्रोन
तज्ज्ञ डॉ. राहुल बोराडे, फ्रेंच भाषा तज्ज्ञ सौ. स्मिता सैंदाणकर, बास्केटबॉल
प्रशिक्षक श्री. अमर भिंगे, बांधकाम व्यावसायिक श्री. प्रसाद बागड, श्री. भूषण
महाजन, श्री. सत्यजित महाजन, श्री. संजय पाटकर, श्री. दिलीप पाटकर, भोसलाचे श्री.
योगेश चकोर, ट्रेकर श्री. संजय अमृतकर, डॉ. प्रियनाथ घोष, केंद्रीय विद्यालयाच्या
शिक्षिका सौ. माधुरी देवरे, झेडपीचे निवृत्त कॅफो श्री. उत्तम कावडे, प्रा. चंद्रकांत
येवले, सुला वाईन्सचे मॅनेजर श्री. शामकांत अमृतकर, प्रा. विनोद दशपुते, भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) नाशिकचे अधिकारी वर्ग आदींचा
समावेश होता. अजूनही अनेक जण उपस्थित होते. मात्र, जेवढे स्मरणात राहिले तेवढे
नम्रपणे नमूद करतो. नजरचुकीने कुणाचे नाव राहिले असेल तर कृपया गैरसमज नसावा.
खरं
तर मी मूळचा चाळीसगावचा. नाशकात येऊन २६ वर्षे झाली. त्यामुळे नाशिककरच. या शहराने
मला आपलेसे केले, अंगाखांद्यावर खेळवले आणि आता पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त मिळालेला
भरभरून प्रतिसाद मला खूपच सुखावणारा आहे. सोहळ्यानंतर पुस्तकावर माझी व कर्नल भट
सरांची स्वाक्षरी घेण्यासाठी, आमच्यासोबत फोटो काढण्यासाठी जी झुंबड उडाली ती अभूतपूर्वच
होती. समारंभावेळी सर्व पुस्तकांची विक्री झाल्याने अनेक रसिकांना ती मिळाली
नाहीत. त्यामुळे ज्योती स्टोअर्सचे संचालक श्री. वसंत खैरनार यांनी दिलगिरी व्यक्त
केली.
माझ्या
लहानपणाचा काळ आम्हा ब्राह्मणकर कुटुंबियांसाठी अत्यंत संघर्षमय राहिला आहे. माझे
वर्गमित्र राहत असलेल्या झोपडपट्टीतच मी पाव विक्री केली. मालेगाव तालुक्यातील
कळवाडी या आत्याच्या गावाने आम्हाला नवजीवन दिले. त्यानंतर आमचे कुटुंब हळूहळू
नाशिकमध्ये स्थायिक झालो. बारावी नंतर पुढील शिक्षणासाठी मी नाशिक गाठले. २००३
पासून आजतागायत शिक्षण आणि पत्रकारितेची सांगड काही सुटलेली नाही. आर्थिक स्थिती
फारशी चांगली नसल्याने सातपूरच्या श्रमिकनगर ते आरवायके कॉलेज आणि पुढे अशोक
स्तंभावरील दै. सकाळ कार्यालयात मी दररोज सायकलने ये-जा करायचो. संकट काळापासून ते
आजच्या पुस्तक प्रकाशनाच्या समारंभापर्यंतचा प्रवास हा अतिशय खडतर आणि आव्हानात्मक
राहिला आहे. मात्र, या कालखंडात मला अनेक व्यक्तींचे अनमोल मार्गदर्शन विविध
टप्प्यांवर लाभले त्यामुळेच मी इथवर येऊन पोहचलो आहे. माझी पत्नी सौ. अश्विनी,
सळसळते चैतन्य असलेली कुमारी आभा आदरणीय पिताश्री आणि तिन्ही ज्येष्ठ बंधू, तिन्ही
वहिनी, तिन्ही पुतणे आणि दोन्ही पुतण्या या सर्वांची भक्कम साथ माझ्या पाठिशी आहे.
ज्या कुसुमाग्रजांमुळे नाशिक ओळखले जाते त्यांच्याच नावाची अभ्यासवृत्ती मिळावी आणि
त्याचे पुस्तक साकार होऊन ते मराठी साहित्य विश्वात दाखल व्हावे हे माझ्यासाठी
खुपच सुखद आहे.
खंत
फक्त एकच आहे की या सोहळ्यासाठी आज मातोश्री उपस्थित असत्या तर त्यांना केवढा आनंद
झाला असता! प्रकाशन समारंभासाठी रसिकांची ही
उपस्थिती मला माझ्या जबाबदारीची जाणिव करून देत आहे. इथून खरी सुरूवात आहे, असेच
मनोमन वाटते आहे. या समारंभाने मला लेखकांच्या पंक्तीत बसवून ठेवले आहे. यापुढील
काळात पत्रकारितेसह साहित्य क्षेत्रातही भरघोस योगदान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न
करेन. यासाठीच मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून एमए (मराठी) चे
शिक्षण सध्या घेत आहे. रसिकजनांसह माझ्यावर नितांत प्रेम करणाऱ्यांच्या अपेक्षांना
खरे उतरेन, असा शब्द देतो. प्रकाशन समारंभासाठी मला प्रत्यक्ष आणि
अप्रत्यक्षरित्या मार्गदर्शन व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. पुन्हा
एकदा नमूद करतो की, मी अक्षरशः भारावून गेलो आहे.
मो.
९४२३४७९३४८
--
पुस्तक
येथे मिळेल
योगेश्वर बुक डेपो, अशोकनगर, सातपूर, नाशिक मो. 9423912114
ज्योती स्टोअर्स, प्रसाद सर्कल जवळ, गंगापूररोड, नाशिक मो. 9422257117
ऑनलाईन घेण्यासाठी लिंक
दिलीपराज प्रकाशन -
https://www.diliprajprakashan.in/products/arunoday-by-bhavesh-brahmankar
अमेझॉन -
https://www.amazon.in/dp/8194542839?ref=cm_sw_r_ffobk_cso_wa_apan_dp_QSFS1PR29YG0WBHT87FB&ref_=cm_sw_r_ffobk_cso_wa_apan_dp_QSFS1PR29YG0WBHT87FB&social_share=cm_sw_r_ffobk_cso_wa_apan_dp_QSFS1PR29YG0WBHT87FB&bestFormat=true



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा