महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काय काम करते?

सामना उत्सव पुरवणी विशेष

--

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काय काम करते?

--

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अर्थात एमपीसीबी. राज्यातील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी, होणारे प्रदूषण थांबविण्यासाठी आणि प्रदूषण होऊ नये यासाठी ठोस कार्यवाही व्हावी यासाठीच या मंडळाची स्थापना आहे. देशपातळीवर राष्ट्रीय तर राज्य पातळीवर त्या त्या राज्यांचे प्रदूषण मंडळ अशी रचना आहे. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालय, आरोग्य मंत्रालय, जलसंपदा मंत्रालय यांनी घेतलेल्या विविध निर्णयांची आणि कायद्यांची अमंलबजावणी करण्याची जबाबदारी मंडळाकडे आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी विविध घटकांसाठी तयार केलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन करण्यासाठी, शहानिशा करण्यासाठीही मंडळ जबाबदार आहे. परिणामी, मंडळाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

महाराष्ट्र जल प्रदूषण प्रतिबंध अधिनियम, १९६९, च्या तरतुदीनुसार ७ सप्टेंबर १९७० रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना झाली. केन्द्रीय विधिविधान असलेल्या जल (पीएन्डसीपी) अधिनियम १९७४ च्या कलम ४ च्या तरतुदींनुसार दिनांक १.६.१९८१ रोजी महाराष्ट्रामध्ये जल अधिनियम १९७४ लागू करण्यात आला आणि तदनुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ स्थापन करण्यात आले. हवा  अधिनियम १९८१ नुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्य ६.११.१९९६ पासून हवा प्रदूषण नियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. हवा अधिनियम १९८१ च्या कलम ५ अनुसार हे मंडळ राज्य मंडळ म्हणून कार्यरत आहे.

मंडळाला एक अध्यक्ष आहे. आयएएस अधिकारी त्याचे सदस्य सचिव असतात आणि तेच प्रामुख्याने कारभार बघतात. विभागनिहाय राज्यात मंडळाची एकूण १२ कार्यालये आहेत. प्रदूषण प्रतिबंध, नियंत्रण किंवा बंदी आणि त्याची सुरक्षितता यासाठी व्यापक कार्यक्रमांची योजना करण्याची मंडळावर जबाबदारी आहे. प्रदूषण विषयक माहिती गोळा करणे, तिचा प्रचार करणे व त्याला प्रतिबंध, नियंत्रण व बंद करणे, सांडपाणी किंवा व्यापारी सांडपाणी व टाकावू पदार्थांच्या निपटाऱ्याच्या सुविधांचे तसेच हवा प्रदूषण नियंत्रण पद्धतीचे निरीक्षण करणे, ट्रिटमेंट संयंत्र, निपटाऱ्याच्या पद्धती तसेच हवा प्रदूषण नियंत्रण पद्धती या विषयीच्या योजना, विनिर्देश किंवा इतर माहितीचा आढावा घेणे, प्रदूषण नियंत्रण, टाकावू पदार्थांचे रिसायकल करुन पुन्हा उपयोग घेणे, पर्यावरण अनुकूल पद्धती इत्यादी क्षेत्रात होणाऱ्या विकासाला सहाय्य करणे, प्रोत्साहन देणे, योग्य प्रदूषण नियंत्रण तंत्रज्ञान व पद्धतीद्वारे पर्यावरण वृद्धीसाठी उद्योजकांना शिक्षीत करणे व मार्गदर्शन देणे, स्वच्छ व स्वस्थ पर्यावरणाविषयी सार्वजनिक जागरुकता निर्माण करणे तसेच प्रदूषणासंबंधी सार्वजनिक तक्रारींची दखल घेणे, अशी मंडळाची कार्यपद्धती आहे. विविध प्रकारच्या उद्योग, व्यवसायांना आवश्यक त्या परवानग्या देण्याचेही काम मंडळाकडे आहे.

राज्यभरात नद्यांच्या प्रदूषणाचा विषय असो की उद्योगांद्वारे बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याचा विषय साऱ्याच पातळ्यांवर मंडळाचे कामकाज महत्वपूर्ण ठरते. प्रदूषण होत असल्यास मंडळाकडून संबंधितांना नोटीस बजावली जाते. उद्योगांचे वा विविध प्रकारचे सांडपाणी थेट नदीत मिसळतेय यामुळे नदीचे प्रदूषण होते. त्यामुळे सांडपाणी प्रक्रिया केंद्राची तपासणी करणे, त्यातील पाण्यात असलेल्या घटकांची शहानिशा करणे, नदीत किती आणि कसे प्रदूषण होते आहे हे शोधणे आदी कामे प्रदूषण नियंत्रण मंडळाला करावी लागतात.

- भावब्राह्म

--

bhavbrahma@gmail.com

संरक्षण, सामरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी, परराष्ट्र संबंध आणि पर्यावरणाचे अभ्यासक. तसेच मुक्त पत्रकार. मो. 9423479348

--

आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा

--

Please Follow me on :

WhatsApp Channel  - https://whatsapp.com/channel/0029VapnkDV7tkj50q5hUm1v

Facebook   - www.facebook.com/BhaveshBrahmankar

X (Twitter)  - www.twitter.com/BhavBrahma

Instagram   - https://www.instagram.com/bhavbrahma

Blog            - https://bhavbrahma.blogspot.com/

--

#maharashtra #pollution #controll #board #environment #mpcb #pcb


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे हार्दिक निमंत्रण

भारतावर हे महाकाय संकट धडकणार? (नवशक्ती)

तब्बल १९ देशांच्या एकजुटीने चीनला धडकी (नवशक्ती)