लाखो भारतीय कावळ्यांवर संक्रांत! हा देश करणार विषप्रयोग! (अक्षरनामा)

लाखो भारतीय कावळ्यांवर संक्रांत ! हा देश करणार विषप्रयोग ! हेडिंग वाचून दचकलात ना ! पण हे खरे आहे. लाखो भारतीय कावळ्यांचा जीव घेण्यासाठी विषप्रयोगाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे त्याची जगभर चर्चा होत आहे. कोणता आहे हा देश ? एवढ्या मोठ्या संख्येने कावळ्यांना का मारले जाणार आहे ? जाणून घेऊ याविषयी सविस्तर.... भावेश ब्राह्मणकर आपल्याकडे चिमण्या दिसेनाशा झाल्या म्हणून आपण कासावीस झालोय. म्हणूनच आपण चिमणी दिवसही साजरा करायला लागलोय. चिमणी, तिचे आपल्या भोवतीचे अस्तित्व, परिसंस्थेतील तिची जागा या आणि अशा कितीतरी बाबींची जनजागृती केली जात आहे. हे सारे सुरू असतानाच मात्र, भारतीय कावळ्यांवर संक्रांत आल्याची बाब उघड झाली आहे. तुम्हाला असे वाटेल की, कावळ्यांवर का आणि कशी संक्रांत येईल ? पण हे खरे आहे. आणि हे भारतात नाही तर केनियात घडते आहे. केनियामधील हॉटेल व्यावसायिक, शेतकरी यांना चक्क कावळा मारण्याचा परवाना देण्यात आला आहे. कावळ्यांवर विषप्रयोग केला जाणार आहे. त्याद्वारे भारतीय कावळ्यांची संख्या लक्षणीयरित्या घटविण्याचे उद्दीष्ट आहे. केनियातील प्रसारमाध्यमांनुसार, या वर्षभरा...