कचरा नव्हे चक्क सोनंच! कचरा व्यवस्थापनात करा करिअर
घरगुती, औद्योगिक, वैद्यकीय अशा विविध प्रकारचा कचरा तसं म्हटलं तर डोकेदुखी आहे. पण, या कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याचे कसब आजच्या काळाची नितांत गरज आहे. याच क्षेत्रात करिअर करुन कचऱ्याची गंभीर समस्या सोडवून पर्यावरणाच्या रक्षणात हातभार लावू शकतो.
भावेश ब्राह्मणकर
bhavbrahma@gmail.com
कौशल्य
- कचरा म्हणताच नाकाला रुमाल लावत असाल तर हे काम तुमच्यासाठी नाही.
- उलट कुठलाच कचरा हा टाकाऊ नसतो या कुतूहलाने जर काम करण्याची तयारी असेल तर कचऱ्यातून सोने शोधता येईल.
- नवनवीन कल्पना सुचायला हव्यात त्यातूनच कचऱ्याच्या विल्हेवाटाची एखादी नामी युक्ती गवसू शकेल.
- कचऱ्यावर प्रक्रिया किंवा त्यासंबंधीच्या प्रकल्पाच्या ठिकाणी काम करण्यात रस असायला हवा.
पात्रता
- विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना यात करिअर करता येईल. त्यासाठी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून पदवी संपादन करणे आवश्यक आहे.
- पर्यावरणशास्त्र, पर्यावरण विज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र यापैकी एका विषयाची पदवी असणे गरजेचे आहे.
- अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी वरील विषयांसह अभियांत्रिकीची पदवी असायला हवी.
शिक्षण
- रसायनशास्त्र, पर्यावरण व्यवस्थापन, पर्यावरणशास्त्र हे विषय घेऊन अभियांत्रिकी शाखेची पदवी मिळवता येईल. अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये हे कोर्स उपलब्ध आहेत.
- व्यवस्थापनशास्त्र शाखेतही पर्यावरण विषयाचा अभ्यासक्रम सुरू झाला आहे.
- आयआयटीसारख्या संस्थेतही सदर अभ्यासक्रम उपलब्ध आहे. तेथे अभियांत्रिकी शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेता येईल.
- काही खासगी संस्थांनीही यासंबंधीचे प्रमाणपत्र तसेच पदविका अभ्यासक्रम सुरू केले आहेत.
- नागपूरच्या निरी संस्थेनेही एक अभ्यासक्रम सुरू केला आहे.
- जैवतंत्रज्ञान शाखेतील काही विषयांचे अभ्यासक्रमही कचरा व्यवस्थापनाशी संबंधित आहेत. तेथेही शिक्षण घेता येईल.
संधी
- कचरा व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीमध्ये संधी मिळेल.
- नगरपालिका, महापालिका यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही नोकरी मिळू शकते.
- प्रदूषण नियंत्रण मंडळामध्येही संधी मिळू शकेल.
- कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या किंवा त्याची विल्हेवाट लावणाऱ्या संस्थांमध्ये काम करता येईल.
- कचरा व्यवस्थापनाचा स्वतःचा उद्योग किंवा कंपनी स्थापन करता येईल.
- कचरा व्यवस्थापनासंदर्भात विविध संस्था, संघटना, सरकार यांना मार्गदर्शन किंवा सल्ला देता येईल.
- कचरा व्यवस्थापनाशी संबंधित आधुनिक यंत्र, उपकरणांची निर्मिती आणि त्याची विक्री करता येईल.
- कचरा व्यवस्थापनाचे कंत्राट घेता येईल.
- कचऱ्याची विल्हेवाट लावणारा कारखाना उभारता येईल.
- कचरा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांना विविध प्रकारच्या सोयी-सुविधा पुरवता येतील.
Environment Education Waste Management Career Biomedical e waste solid waste construction waste syllabus course
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा