पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

निसर्गराजा परिवर्तनाची गोष्ट सांगतो (मुक्त संवाद दिवाळी अंक)

इमेज
सातपुड्यातील आदिवासींची निसर्गपूजा सातपुडा पर्वत रांगेतील आणि नंदुरबार जिल्ह्यात असलेल्या आदिवासी गावांनी जैवविविधतेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी घेतलेला पुढाकार अजूनही माध्यमांपासून कोसोदूर आहे. आदिवासी बांधवांनी आपल्या कृतीतून आणि निसर्गपुजेद्वारे सर्वांसमोरच एक मोठा आदर्श निर्माण केला आहे. पाच-सहा गावांच्या पुढाकाराने सुरु झालेली ही चळवळ आता परिसरातील ३० गावांमध्ये पोहोचली आहे. चला तर वेळ न दवडता सातपुड्यातील या विलक्षण कार्याची सफर करुया... आपल्याला हा लेख कसा वाटला? आपली प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा

चीनसोबतचा सीमावाद कसा मिटला? (नवशक्ती)

इमेज
पूर्व लडाखमध्ये चीनसोबत असलेला सीमावाद मिटल्याची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांपासूनच्या चर्चेला आताच पूर्णविराम कसा मिळाला ? दोन्ही देशात नक्की काय ठरले आहे ? चीनने माघार घेतली का ? भारताच्या पदरात नक्की काय पडले आहे ? भावेश ब्राह्मणकर भारताच्या उत्तरेला हिमालयीन पर्वत रांगेतील आणि पूर्व लडाखचा प्रदेश असलेल्या गलवान, डेमचोक, डेपसांग, पेंगाग त्सो सरोवर या भागातील चीन सोबतचा सीमा वाद जगविख्यात आहे. २०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीन या दोन्ही सैन्यांमध्ये हिंसक संघर्ष झाला. भारतीय सैन्याचे कर्नलसह २० जवान शहीद झाले. चीनचेही मोठ्या संख्येने सैनिक ठार झाले. पण ते अधिकृतपणे जाहीर करण्यात आले नाही. २०२० पासून दोन्ही देशांमधील संबंध बिघडले. तणाव निर्माण झाला. सीमेलगत भारत आणि चीनने प्रत्येकी जवळपास ५० हजार सैनिकांची तगडी फौज तैनात केली. दोन्ही बाजूकडून लष्करी आणि राजनैतिक पातळीवर वाटाघाटी सुरू होत्या. अखेर चार वर्षांनंतर दोन्ही देशांनी तोडगा काढला आहे. सर्वप्रथम भारताने यासंदर्भात जाहीरपणे माहिती दिली. त्यानंतर चीननेही पत्रकार परिषद घेऊन माहिती सादर केली आहे. ही सहमती काय...

भारत-कॅनडातील वादाचा नवा अंक (नवशक्ती)

इमेज
भारताने कॅनडातील उच्चायुक्तांसह सहा अधिकाऱ्यांना तडकाफडकी मायदेशी बोलवून घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर, कॅनडाच्या भारतीय दुतावासातील सहा अधिकाऱ्यांना भारत सोडून जाण्याचे फर्मान जारी केले आहे. दोन्ही देशातील हा तणाव म्हणजे नवा अंक आहे. मात्र, या वादाला वेगळीच किनार आहे.   भावेश ब्राह्मणकर प्रत्येक देशातील दुतावास हे परराष्ट्र संबंध, व्यापार, मुत्सद्देगिरी आणि अनेक अर्थाने महत्वाचे असते. हे दुतावास दोन्ही देशांसाठी दुवा तर बनतेच पण अधिकाऱ्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे परराष्ट्र संबंधांना कलाटणी देणारेही ठरते. हे सारे सांगायचे कारण म्हणजे भारत आणि कॅनडा यांच्यात निर्माण झालेला तणाव. गेल्या वर्षभऱापासून दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले. आता त्याचा पुढचा अंक पहायला मिळत आहे. भारताने कॅनडामधील दुतावासात कार्यरत असलेल्या उच्चायुक्तांसह सहा अधिकाऱ्यांना १९ ऑक्टोबरपर्यंत भारतात येण्याचे सांगितले आहे. तर, नवी दिल्लीत असलेल्या कॅनडा दुतावासातील उच्चायुक्तांसह सहा अधिकाऱ्यांना तातडीने देश सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत. दोन्ही देशातील संबंध एवढे विकोपाला का गेले हे पाहणे महत्त्वाचे आहे....

लोकहिताचे भांडवल हरवले (नवशक्ती)

इमेज
लोकहिताचे भांडवल हरवले  टाटा उद्योग समुहाची धुरा सांभाळणाऱ्या रतन टाटा यांच्या निधनाने आपल्यातला माणूस हरपल्याची भावना जवळपास सर्वांचीच आहे. आजवर अनेक उद्योगपती गेले पण त्यावेळी असे झाले नाही. टाटा त्याला अपवाद ठरले. कारण त्यांची कार्यशैली, विचार, नम्रता, वागणूक आणि साधेपणा. असा व्यक्ती कोट्यवधीत एखादाच असतो. आपण आता त्यालाच मुकलो आहोत. भावेश ब्राह्मणकर सामान्य कामगारांच्या रांगेत उभे राहणे, त्यांच्यासोबत जेवण घेणे आणि संपूर्ण दिवस त्यांच्याबरोबर राहून सेवानिवृत्ती घेणे... २६-११च्या दहशतवादी हल्ल्यावेळी ताज हॉटेल बाहेर उभे असलेले, आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी तिळतिळ तुटणारे, मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाचा आधारवड बनणारे, मोठ्या हिमतीने कोट्यवधी खर्चून हॉटेल पुन्हा सेवेत आणणारे... पावसात स्कूटरवर जाणाऱ्या त्रिकोणी कुटुंबाकडे पाहून नॅनो कारचे स्वप्न पाहणारे आणि ते प्रत्यक्षात आणणारे... डोकोमो कंपनीला ७६०० कोटी रुपयांचे देणे टाटांना होते. सरकारने परवानगी नाकारली. अखेर कोर्टात जाऊन त्यांनी हे देणे दिले... अत्यंत प्रतिष्ठीत पुरस्काराने गौरविण्यासाठी ब्रिटनचे युवर...

काश्मीरच्या निवडणुकीचा अन्वयार्थ (नवशक्ती)

इमेज
  काश्मीरच्या निवडणुकीचा अन्वयार्थ संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या जम्मू आणि काश्मीरमध्ये सार्वत्रिक निवडणुका सकुशल संपन्न झाल्या आहेत. अत्यंत पारदर्शकता, मतदारांचा प्रचंड उत्साह, लोकशाही व्यवस्थेवरील दृढ विश्वास, सुरक्षा यंत्रणांची चोख कामगिरी यामुळे ही निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरते. तसेच, या निवडणुकीने जगभरात अनेक संदेश गेले आहेत. तोच या निकालाचा अन्वयार्थ आहे. भावेश ब्राह्मणकर भारतीय स्वातंत्र्यापासून आजवर ज्या राज्याविषयी सर्वाधिक बोलले, लिहिले आणि वाचले जाते ते म्हणजे काश्मीर. किंबहुना जगभर याच राज्याची चर्चा होते. हिमालय पर्वतरांगेतील हा प्रदेश म्हणजे भारताचा शिरोमणी. बर्फ, हिमनद्या, उंचच उंच पर्वत, अनेक नद्यांचा उगम, खोल दऱ्या अशा प्रकारच्या भौगोलिक वातावरणाने समृद्ध असलेल्या या प्रदेशाला मात्र दहशतवाद आणि असुरक्षेची झालर आहे. या प्रदेशावर नक्की हक्क कुणाचा या अहमहिकेने त्याचा इतिहास रंगला आहे. भारत आणि पाकिस्तान या शेजारी देशांमधील वाद आणि तणाव याच प्रदेशावरुन आहेत. म्हणूनच येथे युद्धाचे तांडवही अनेकदा नाचले आहे. शेकडो सुरक्षा जवान आणि अधिकाऱ्यांचे बळी गेले. तरीही आजत...

तिसऱ्या महायुद्धाची वाढती भीती (नवशक्ती)

इमेज
तिसऱ्या महायुद्धाची वाढती भीती  इस्त्राइल-हमास, इस्त्राइल-लेबनॉन, इस्त्राइल-इराण किंवा रशिया-युक्रेन या संघर्षामध्ये दररोज शेकडो निष्पाप मृत्युमुखी पडत आहेत. लहान मुले, स्त्रिया, पुरुष, वृद्ध असे कुणीही अपवाद नाही. विशेष म्हणजे, जगभरातील ७९५ कोटी लोकसंख्या हे सारे निमूटपणे पाहत आहे. भावेश ब्राह्मणकर तब्बल अडीच वर्षांपासून रशिया-युक्रेन तर गेल्या वर्षभरापासून मध्य पूर्वेत इस्त्राईलचा विविध देशांशी हिंसक संघर्ष सुरू आहे. रशिया-युक्रेन युद्धात आतापर्यंत जवळपास १ लाख सैनिक आणि २० हजाराहून अधिक नागरिक ठार झाले आहेत. तर, इस्त्राईलचा विविध देशांशी असलेल्या संघर्षात १० हजाराहून अधिक सैनिक व नागरिकांचा बळी गेला आहे. (हानीची ही आकडेवारी प्रत्यक्षात अधिकच आहे) म्हणजेच जगातील या दोन द्वंद्वामध्ये सव्वा लाखाहून अधिक प्राण गेले आहेत. एवढे होऊनही युद्ध संपण्याची चिन्हे नाहीत. उलट ती भडकतच आहेत. आणखी किती जणांचा जीव घेतला जाईल, हे कुणीही सांगू शकत नाही. ही बाब अतिशय गंभीर आणि चिंताजनक असली तरी जगभरातील १९० हून अधिक देश हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून आहेत. हीच खरी शोकांतिका आहे. आजवरच्या इत...

सावधान, भारतात हत्तींची संख्या घटतेय!

इमेज
सावधान , भारतात हत्तींची संख्या घटतेय ! हत्तींची भारतातील संख्या गेल्या पाच वर्षात तब्बल २० टक्क्यांनी घटली आहे. गजान्तलक्ष्मीचे रुप असलेले हत्ती कमी होण्यामध्ये विविध कारणे आहेत. राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित झालेला हत्ती भारतात गुण्यागोविंदानं नांदण्यासाठी झगडत आहे. भावेश ब्राह्मणकर डायनासॉरच्या पश्चात पृथ्वीतलावर सर्वात शक्तीशाली आणि महाकाय असलेला प्राणी म्हणून हत्तींची ओळख आहे. जगाच्या पाठीवर दोन प्रकारचे हत्ती आढळतात. आशियाई आणि अफ्रिकी. आशियाई भागात सर्वाधिक संख्येने असलेल्या हत्तींच्या काही प्रजाती आढळतात. त्यामुळे हे हत्ती संपूर्ण विश्वातच आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. आशियातील सर्वात लहान आकाराचा आणि जगातील सजीव आश्चर्य म्हणून ओळख असलेल्या इंडोनेशियातील सुमात्रन हत्तींना नजर लागल्याचं वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड (डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यूएफ)ने   काही वर्षांपूर्वी घोषित केले.  जंगलातील अधिवास झपाट्याने नष्ट होत असल्याने सुमात्रन हत्तींची संख्या लक्षणीयरित्या कमी होत आहे. घटती वनसंख्या आणि जंगल क्षेत्रातील वाढता मानवी हस्तक्षेप ही दोन मुख्य कारणे या परिस्थितीला कारणीभूत आहेत...