संसदीय कामकाज व्हायला हवे (नवशक्ती)

एखाद्या देशाशी थेट युद्ध करण्याऐवजी अप्रत्यक्ष युद्धाची अनेकानेक आयुधे उपलब्ध झाली आहेत. संसदीय कामकाजाला भूसुरुंग लावण्याचे शस्त्र त्यापैकीच एक आहे. गेल्या १०-१५ वर्षातील भारतीय संसदेचा इतिहास काय सांगतो ? भावेश ब्राह्मणकर सीमेवर सैनिक आणि शस्त्रास्त्रांसह युद्ध करण्याचा प्रघात आजच्या आधुनिक युगात मागे पडला आहे. शत्रूला समजणारही नाही अशा पद्धतीने त्याच्यावर भले मोठे अदृष्य आघात करणे, त्याला नामोहरम करणे, सर्वाधिक क्षती पोहचविणे किंवा पार वाताहत करणे अशा प्रकारच्या अत्याधुनिक युद्धशास्त्राचा सर्वत्र बोलबाला आहे. सायबर हल्ला हे त्यातील सर्वाधिक चर्चिले जाणारे शस्त्र आहे. मात्र, त्यापलिकडेही अनेक आयुधे आहेत. ज्याचा वापर अतिशय चपखल पद्धतीने केला जात आहे. खासकरुन गेल्या काही दशकातील भारतीय संसदेच्या कामकाजाचा आढावा घेतला तर ते प्रकर्षाने समोर येईल. भारतीय लोकशाही बळकट होण्यामध्ये संसदीय कामकाज अतिशय महत्वाचे आहे. जनतेने निवडून दिलेले खासदार ‘ देश की बडी पंचायत ’ मध्ये येतात. सत्ताधारी आणि विरोधक असे दोन्ही एकाच ठिकाणी जमतात. देशाचा गाडा योग्य पद्धतीने सुरू राहण्यासाठी, चुकत असेल तर स...