मध्य पूर्वेतील संघर्ष कधी थांबणार? (नवशक्ती)

मध्य पूर्वेतील संघर्ष कधी थांबणार ? मध्य पूर्वेतील इस्त्राईल आणि हमास यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी होत नाही. उलट दिवसागणिक तो अधिक उग्र होत आहे. युद्धातील बळींची संख्या हजारोंच्या घरात आहे. लहान मुले, महिला, ज्येष्ठ असे निष्पाप प्राण गमावत आहेत. तर, लाखो जायबंदी झाले आहेत. या युद्धात आता इराणही उडी घेण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे हा संघर्ष थांबण्यासाठी फक्त चमत्कारच होण्याची गरज आहे. भावेश ब्राह्मणकर गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्राईलवर हल्ला केला. या हल्ल्यात सुमारे १२०० इस्राइली नागरिकांचा बळी गेला. दहशतवाद्यांनी गाझामध्ये सुमारे २५० नागरिकांना ओलीस ठेवले होते. इस्राईलच्या म्हणण्यानुसार, १११ नागरिक अजूनही हमासच्या कैदेत आहेत. यामध्ये ३९ मृतदेहांचाही समावेश आहे. ओलिसांमध्ये १५ महिला आणि ५ वर्षाखालील २ मुलांचा समावेश आहे. ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर संतप्त झालेल्या इस्राईलने हमासविरोधात युद्धाची घोषणा केली आणि थेट हमासवर धडाकेबाज हल्ले सुरू केले आहेत. या युद्धात आतापर्यंत ३२९ इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला आहे. इस्त्राईल आणि हमास यांच्यातील युद्धात गेल...