उत्तरेमुळे बिघडतेय चेन्नईची हवा! (सामना - उत्सव पुरवणी)

उत्तरेमुळे बिघडतेय चेन्नईची हवा ! राजकीय वैर आणि सत्ताधाऱ्यांमधील मतभेदांमुळे दिल्ली आणि चेन्नई यांचे नाते विळ्याभोपळ्याचे आहे. त्यामुळे उत्तर-दक्षिणेतील वाद नेहमीच चर्चेत असतात. त्यातच आता तर उत्तरेमुळे चेन्नईची हवा बिघडत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. भावेश ब्राह्मणकर केंद्रातील भाजप सरकार आणि तामिळनाडूतील डीएमके सरकार यांच्यातील वाद बहुचर्चित आहे. राज्यपालांची भूमिका आणि वर्तन असो की प्राथमिक शिक्षणात तिसरी भाषा म्हणून हिंदीचा समावेश किंवा जीएसटीच्या थकीत रकमेचे वितरण अशा विविध पातळ्यांवर केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात मतभेद आहेत. तमिळ अस्मिता विरुद्ध उत्तरेचे राजकारण असाही पदर त्यास जोडला जातो. गेल्या अनेक दशकांपासून उत्तर विरुद्ध दक्षिण असे चित्र रंगते आहे किंवा रंगविण्यात येते. त्यातही भारतीय जनता पक्षाकडून प्रादेशिक पक्षांना अडचणीत आणण्याचे राजकारण केले जात असल्याचा आरोपही डीएमके पक्षाकडून केला जातो. मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दाही असाच तापला. लोकसंख्यावाढीमुळे उत्तरेत खासदारांची संख्या अधिक होईल. मात्र, नियोजनामुळे दक्षिणेत लोकसंख्या स्थिर राहिल्याने तेथील खासदार तेव...