कोंडीच्या खताला मुत्सद्देगिरीची उतारा! (नवशक्ती)

कोंडीच्या खताला मुत्सद्देगिरीची उतारा ! भारतीय अर्थव्यवस्थेची कोंडी करण्याचा डाव हाणून पाडण्यात केंद्र सरकारला यश आले आहे. मुत्सद्देगिरीतून भारताने खेळलेले डावपेच यशस्वी झाले आहेत. इथून पुढेही असेच होणे आवश्यक आहे. भावेश ब्राह्मणकर गेल्या वर्षापासूनच भारतीय अर्थव्यवस्थेभोवती एक अदृष्य वादळ घोंघावत होते. त्याची फारशी कल्पना भारत सरकारला आली नाही. या वर्षाची सुरुवात होताच ते वादळ आणखी मोठे होऊ लागले. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात भारताने ‘ ऑपरेशन सिंदूर ’ राबविले. त्यानंतर मात्र, भारतीय अर्थव्यवस्थेला जबर हानी पोहचविण्याचा चंग झाला. मान्सूनचा वर्षाव सुरू होत असतानाच या वादळाने वेग घेतला. पण, हे वादळ थोपविण्यात अखेर भारत सरकारला यश आले आहे. शह देण्याच्या प्रयत्नांना थेट काटशह देऊन भारताने बाजी उलटवली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर ही बाब आता ठळक झाली आहे. भारताचा शेजारी असलेला आणि महासत्तेकडे मार्गक्रमण करणारा चीन हा कुटील कारस्थानांसाठी ख्यात आहे. खासकरुन भारताविरोधात त्याचे डावपेच सतत सुरू असतात. आताही चीनने भारतीय कृषी क्षेत्राला लक्ष्य करण्याचे उद्दीष्ठ ठेवले खरे पण त्याला त...